गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी भवनाच्या आवारात लावलेले होर्डीग जिल्हा परिषद प्रशासन उपविभाग बांधकाम विभागाच्या वतीने काढण्यात आले

13

गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी भवनाच्या आवारात लावलेले होर्डीग जिल्हा परिषद प्रशासन उपविभाग बांधकाम विभागाच्या वतीने काढण्यात आले

 

गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी भवनाच्या आवारात लावलेले होर्डीग जिल्हा परिषद प्रशासन उपविभाग बांधकाम विभागाच्या वतीने काढण्यात आले.

 

ही कारवाई करतांना होर्डिंग चे लहान लहान तुकडे करून टाकल्याने चारही होर्डीग मालकांचे प्रत्येकी पाच लाख प्रमाणे जवळपास वीस लाखांचे नुकसान या कारवाई मुळे झाले आहे. तसेच ही कारवाई करतांना नगर पालिकेच्या वतीने लावण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे बॅनर सुध्दा फाडून टाकण्याचे कामही जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

होर्डीग बळजबरीने काढणे व त्या करीता घरगुती गॅस सिलेंडर चे वापर करणे चुकीचे असल्याने जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या विरोधात पोलिस तक्रार करण्यात येणार असल्याचे तसेच ही कारवाई करण्यापूर्वी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने जमा केलेली अनामत रक्कमही परत न देता, ह्या कारवाई ची होडींग मालकांना कोणतीही लिखित स्वरूपात माहिती देण्यात आली नव्हती. सदर कारवाई च्या विरोधात न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्यात येणार असल्याचेही होर्डिंग मालकांनी सांगितले आहे