छल्लेवाडा येते नवीन अंगणवाडीचे उदघाटन 

114

छल्लेवाडा येते नवीन अंगणवाडीचे उदघाटन 

जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी केली उदघाटन 

▪️जिल्हा परिषद् गडचिरोली पंचायत समिती अहेरी अंतर्गत बाल विकास प्रकल्प अंतर्गत सुरू असलेल्या रेपनपली ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या छल्लेवाडा येते नवीन अंगणवाडी केंद्राच्या उद्घाटन जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आली आहे.
सदर उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अहेरी पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे होते,यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्री.अजय नैताम,रेपनपलीचे सरपंचा सौ.लक्ष्मी मडावी,उपसरपंच श्री.विलास नेरला,ग्रा.प.सदस्य वरलक्ष्मी झोडे,अशोक झाडे,पूजा देवगडे,संतोष गावडे,राहुल सुंदिला,लक्ष्मण कोडापे,अनुप्रिया भासरकर,प्रशांत गोडसेलवार,इरसाद शेख आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन ग्रामसेवक श्री.सिडाम यांनी तर आभार प्रदर्शन श्री.आर.मूरमाडे, यांनी केली. यावेळी आंगनवाडी सेविका आशा वर्कर,व गावातील प्रतिस्तिट नागरिक उपस्थित होते.