*स्वस्त धान्य दुकानदार आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या पाठीशी*

19

*स्वस्त धान्य दुकानदार आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या पाठीशी*

 

*गडचिरोली येथे स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचा मेळावा*

 

*गडचिरोली, चामोर्शी व धानोरा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने आमदार डॉ. देवरावजी होळी यांचा सत्कार*

 

*समस्या सोडवण्यासाठी सदैव पुढाकार आमदार महोदयांची उपस्थितांना ग्वाही*

 

*दिनांक २१ सप्टेंबर गडचिरोली*

 

*गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे तडफदार लोकप्रिय आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे कार्य नेहमीच विकासाच्या दृष्टीचे राहिले असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील चामोर्शी, गडचिरोली व धानोरा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असे प्रतिपादन गडचिरोली येथे झालेल्या स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या मेळावा प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करताना केले.*

 

*याप्रसंगी मंचावर आमदार डॉ. देवरावजी होळी, गडचिरोली स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष सुरेश जी बांबोळे, रामदास पिपरे, मोहन पाल, सुनीता झंझाळ, गेडाम, सुनिल आयतुलवार, चंद्रकांत दरडे, संजय अलोणे प्रामुख्याने उपस्थित होते.*

 

*याप्रसंगी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी उपस्थित दुकानदारांना मार्गदर्शन करताना आपल्या समस्या सोडवण्यासाठी मी सदैव पुढाकार घेतला असून यापुढेही तुमच्या समस्या जाणून घेण्यासाठी अग्रेसर राहीन असे आश्वस्त केले. या मेळाव्याला परिसरातील स्वस्त धान्य दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.*