पोलीस दलाच्या पुढाकाराने अतिदुर्गम गर्देवाडा येथे बस सेवा सुरु

24

पोलीस दलाच्या पुढाकाराने अतिदुर्गम गर्देवाडा येथे बस सेवा सुरु

श्व् पोमकें गर्देवाडा हद्दीतील 12 गावांतील नागरिकांना मिळणार बस सुविधा

 

 

गडचिरोली जिल्हा हा माओवादग्रस्त जिल्हा म्हणुन ओळखला जातो. जिल्हयातील भौगोलिक परिस्थितीचा फायदा माओवादी घेण्याचा प्रयत्न करीत असतात, परंतु गडचिरोली पोलीस दल माओवादयांच्या या प्रयत्नांना यश मिळु देत नाही. जिल्हयातील दुर्गम-अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी पोलीस दल सदैव प्रयत्नशील असते. त्याचा परिपाक म्हणुन एकेकाळी माओवादयांचा गड समजल्या जाणा­या जिल्हयातील अतिसंवेदनशील गर्देवाडा येथे दि. 15/01/2024 रोजी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली होती. पोलीस मदत केंद्राच्या निर्मितीपासुन तेथील परिसरातील नागरिकांना विविध सोई-सुविधा गडचिरोली पोलीस दलामार्फत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. याचाच एक भाग म्हणुन आज दि. 22/09/2024 रोजी गर्देवाडा ते अहेरी अशी प्रथमच महाराष्ट्र परिवहन विभागाची एस.टी. बस सेवा सुरु करण्यात आली.

सविस्तर वृत्त असे आहे की, नविन पोलीस मदत केंद्र निर्मितीपुर्वी गर्देवाडा येथुन एटापल्ली-अहेरी इ. मोठया गावांना जाणे-येणे करीता पक्का रस्ता उपलब्ध नव्हता तसेच गट्टा (जां) ते वांगेतुरी दरम्यान असलेला ताडगुडा येथील पुल देखील सुस्थितीत नसल्याने गर्देवाडा परिसरातील 12 गावांतील नागरिकांना मोठया समस्यांना सामोरे जावे लागत होते. परंतु गडचिरोली पोलीस दलाच्या सततच्या पाठपुराव्याने ताडगुडा येथील पुलाचे तसेच रस्त्याचे बांधकाम वेळेत पुर्ण करण्यात येवुन महाराष्ट्र परिवहन विभाग यांच्या समन्वयाने आज दि. 22/09/2024 रोजी गर्देवाडा ते अहेरी अशी बस सेवा सुरु करण्यात आली.

सदर कार्यक्रमादरम्यान गावातील महिलांच्या हस्ते बसचे पुजन करुन बस सेवा सुरु करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र परिवहन विभागाचे चालक रामु कोलमेडवार व वाहक गणेश गोपतवार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यासोबतच बसचे वाहक गणेश गोपतवार यांनी गावातील नागरिकांना बसच्या प्रवासाचे टप्पे, बस तिकीटाचे दर इ. बाबत विस्तृत माहिती दिली. सदर बस सेवा सुरु झाल्यामुळे गर्देवाडा तसेच परिसरातील इतर गावातील नागरिकांना ये-जा करण्यास व इतर गावांसोबत संपर्क साधण्यास सोईचे होईल. यासोबतच विद्याथ्र्यांना शाळेत जाण्यासाठी, वैद्यकीय सुविधांचा लाभ मिळविण्यासाठी, बँकेचे व ईतर शासकिय कामे विनाविलंब करण्यासाठी बस सेवेची मदत होईल, अशा शब्दात गावातील सर्व नागरिकांनी गडचिरोली पोलीस दलाचे व महाराष्ट्र परिवहन विभागाचे आभार मानले. त्यानंतर गावक­यांना बसमध्ये बसवुन पहिल्या फेरीसाठी बसला रवाना करण्यात आले.

सदरचा कार्यक्रम पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश उपविभागीय पोलीस अधिकारी हेडरी श्री. योगेश रांजनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. सदर कार्यक्रमास सिआरपीएफचे असिस्टंट कमाण्डेट श्री. संतोष डरांगे, पो.नि. जितेंद्र, पोमकें गर्देवाडा येथील प्रभारी अधिकारी पोउपनि. धनाजी शिंदे, पोउपनि. संग्राम अहिरे, एसआरपीएफचे पोउपनि. देवकुळे व पोलीस अंमलदार यांच्यासह मौजा गर्देवाडा येथील 100 ते 120 नागरिक उपस्थित होते.

।।।।।।।।।।।।।।।।।।।।।