सावली- मूल मार्गावर दोन ट्रकची धडक

182

सावली- मूल मार्गावर दोन ट्रकची धडक

कोणतीही जीवित हानी नाही

ट्रक चालक गंभीर जखमी

सावली – मूल मार्गावरील खेडी फाट्याजवळ उभ्या ट्रक ला मागवून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याची घटना आज (दि.2) च्या पहाटेच्या सुमारास घडली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सविस्तर वृत्त असे की, गडचिरोली जिल्ह्यातून ओला बाबू घेऊन येणारा ट्रक क्रमांक एम एच 34 ए बी 0815 हा सावली मार्गे बल्लारशा येथे जात होता. सावली पासून काही अंतरावर खेडी फाट्याजवळ सदर ट्रक ड्रायव्हर नामे बबलू सिंग परमार ट्रक रस्त्याच्या कडेला थांबवून खाली उतरला होता. अचानक मागुन भरधाव वेगाने ट्रक क्रमांक सीजी 08 व्ही 8822 येऊन उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली. या जबर धडकेत चालक देवेंद्र साहू छत्तीसगड हा गंभीर जखमी झाला. धडक इतकी जबरदस्त होती की मागुन येणाऱ्या ट्रकची मोठी नुकसान होऊन केबिन मध्ये अडकलेल्या चालकास काढण्याकरिता जवळपास तीन ते चार तास लागल्याची माहिती आहे. जखमी चालकास ग्रामीण रुग्णालय सावली येथे उपचाराकरिता भरती करण्यात आले असून पुढील तपास सावली पोलिस करीत आहेत.