आर्वी येथे भगवान बुद्धांच्या अस्थिधातूंना हजारो नागरिकांनी केले वंदन

35

आर्वी येथे भगवान बुद्धांच्या अस्थिधातूंना हजारो नागरिकांनी केले वंदन

 

अर्पित वाहाणे वर्धा

 

धम्मप्रचारक सुरेश भिवगडे व सुजित भिवगडे यांची कार्यक्रमाच्या आयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका.

 

आर्वी :-

महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध व परमपूज्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिधातू

महायात्रेच्या अनुषंगाने आर्वी येथे दिनांक 23 सप्टेंबर 2024 ला सहकार मंगल कार्यालय येथे अस्थिधातू अभिवादन कार्यक्रम व धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

तथागत भगवान गौतम बुद्धांच्या अस्थिधातू श्रीलंका येथून आणल्या गेल्या सोबतच बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिदेखील अभिवादनासाठी ठेवण्यात आल्या होत्या.

याप्रसंगी आर्वी आष्टी कारंजा या परिसरातील हजारो लोकांनी यावेळी या पवित्र अस्थिधातूंना अभिवादन करीत पुण्यसंपादन केले.

रमाई बुद्ध विहार भादोळ पुनर्वसन येथून अस्थिधातू कलश महायात्रेला सुरुवात झाली

छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सहकार मंगल कार्यालय वर्धा रोड आर्वी पर्यंत भव्य अशी अस्थिधातूंची महायात्रा काढण्यात आली.

सहकार मंगल कार्यालय आर्वी येथे आयोजित अस्थिधातू अभिवादन कार्यक्रम व धम्म परिषदेत

इंडो एशियन मेत्ता फाउंडेशनचे नितीन गजभिये व स्मिता वाकडे यांनी या महायात्रेच्या आयोजनाची भूमिका मांडली.

भंते नागीत बोधी भंते करुणा किर्ती

भंते धम्मपाल यांनी त्रिशरण पंचशील व धातूवंदना घेतली.

 

या महाकारुणिक भगवान बुद्धांच्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिधातूला अभिवादन करण्यासाठी

खासदार अमर काळे आमदार दादारावजी केचे उपविभागीय अधिकारी आर्वी विश्वास शिरसाट तहसीलदार हरिदास काळे इतर गणमान्य व्यक्तींनी हजेरी लावली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन

धम्म प्रचारक सुरेश भिवगडे

व आभार सुजित भिवगडे यांनी मानले.

या कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी विश्वभूषण भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर 133 वी जयंती उत्सव समिती आर्वी यांनी सांभाळली.

तर अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी

संरक्षण व्यवस्था ऑल इंडिया समता सैनिक दल शाखा आर्वी यांच्यावतीने करण्यात आली होती.

या कार्यक्रमासाठी दानदात्यांनी फार मोलाची मदत केली.

प्रा.डॉ.अनिल भगत प्रा. राजेश सवाई प्रकाश बनसोड प्रा. डॉ. विजया मुळे डॉ. राहुल शेंडे दिनेश सवाई बंडूभाऊ पाचोडे ओमप्रकाश पाटील

प्रा. पंकज वाघमारे दिलीप भाऊ पखाले, अरविंद वावरे,

प्रा. डॉ.अनिल दहाट सिद्धार्थ शेंद्रे विजय वाघमारे, भीमराव मनवर प्रा. डॉ. प्रवीण काळे

रंजना मात्रे राजकुमार सोनटक्के अनिल खैरकार गौतम कुंभारे अनिल गडलिंग मार्शल प्रत्रकार अर्पित वाहाणे संतोष तागडे

विकास मेश्राम आनंद वंजारी

शशिकांत भरोसे प्रमोद चौरपगार

प्रगती अंकुश सहारे, राहुल कांबळे प्रवीण अशोक काळे राजेंद्र नाखले, रवींद्र धनगर, प्रांजली व्यंकटेश आत्राम अथर्व तायवाडे, सुरज मेश्राम

धनराज भवरे, अजय वाघमारे सपना भिवगडे प्रमोद भिवगडे वीरेंद्र दुधे

राणी गजभिये रंजना मात्रे करुणा दाभणे

नरेश बडगे विनोद पायले हेमंत चावरे श्रीकृष्ण लोहकरे, रवींद्र धनगर सुरज मेश्राम कु. पूर्वा सिद्धार्थ भगत भारत मेश्राम पवन जंगम दर्पण टोकसे अमर मेहरे सुरज मेहरे सचिन मनवरे अभिषेक भिवगडे

शुभांगी भिवगडे, मेघराज डोंगरे,

राजू डोंगरे, इत्यादींनी सहकार्य केले.