*लाडक्या बहिणींच्या पाठीशी देवाभाऊंचे सरकार*
*आमदार डॉक्टर देवरावजी होळी*
*कुरुड येथील मेळाव्याला लाडक्या बहिणींचा प्रचंड प्रतिसाद*
*महाविकास आघाडीचा लाडक्या बहिणींच्या पंधराशे रुपयावर डोळा योजना बंद करण्यासाठी चालवली खटापट*
*आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचा केला सत्कार*
*दिनांक २५ सप्टेंबर कुरुड*
*राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वातील महायुतीच्या सरकारने राज्यातील आपल्या लाडक्या बहिणींना दर महिन्याला १५०० रुपयांची भेट दिली असून हे महायुतीचे सरकार लाडक्या बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी कुरुड येथील लाडक्या बहिणींचा मेळाव्याला मार्गदर्शन करताना केले.*
*यावेळी मंचावर भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, भाजपा जिल्हा सचिव दिलीप चलाख, युवा नेते मधुकरराव भांडेकर , सरपंच विनोद मडावी अनिता सातपुते मेघा सुराजगडे. मंजुषा मोहुरले दिपिल चालक साईनाथ बुरांडे, शुभांगी बावनकर मंजुषा सातपुते अहिल्या महूर्ले प्रतिभा वैरागडे यशोधरा सेट्टीवार प्रतिमा सातपुते रंनिता रॉय ( सचिव) यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.*
*यावेळी ते म्हणाले की राज्यातील महाविकास आघाडीचे नेते लाडक्या बहिणींना देण्यात येणाऱ्या १५०० रुपयांच्या विरोधात आहेत. या बहिणींना ही रक्कम मिळू नये ही योजना बंद कशी होईल यासाठी काँग्रेस , शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस व उबाठा शिवसेना प्रयत्न करीत आहे . त्यामुळे लाडक्या बहिणीने येणाऱ्या काळात महायुतीच्या देवाभाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.*
*मेळाव्याला परिसरातील लाडक्या बहिणीनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचा सत्कार केला*