चंद्रपूर महिला काँग्रेस कडून पेट्रोल, डिझेल, आणि गॅसच्या दर वाढीचा निषेध

127

चंद्रपूर महिला काँग्रेस कडून पेट्रोल, डिझेल, आणि गॅसच्या दर वाढीचा निषेध

मोदींची उपहासात्मक केली आरती

चंद्रपूर :- चंद्रपूर महिला काँग्रेस च्या वतीने राज्य महिला काँग्रेस च्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या सूचनेनुसार जनता कॉलेज जवळच्या  कोतपल्लीवार पेट्रोल पंपवर मोदी यांच्या बॅनर ची उपहासात्मक आरती करण्यात आली.

“जय जय जय मोदी,
तुम सबके मोदी
तुम को निशदिन पूजित
स्मरण मन मे रखत
तुम सबसे भारी”

अशी उपहासात्मक आरती महिला काँग्रेस च्या वतीने करण्यात आली.

डिसेंम्बर पासून तब्बल सहा वेळा गॅसचे दर वाढवण्यात आले आहे, तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्या तेलाची किंमत कमी असतांना देखील केंद्र सरकार कडून सतत पेट्रोल आणि डिझेल च्या किमतीत दरवाढ होत आहे, आज पेट्रोल ची किंमत 97 रुपये तर डिझेल ची किंमत 88 रुपये एवढी आहे, पेट्रोल शंभरी पार करत आहे. सामान्य लोक मेटकुटीला आले आहेत. त्यामुळे मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी आज पूर्ण राज्यभर महिला काँग्रेस च्या वतीने मोदी यांची उपहासात्मक आरती करून निषेध करण्यात आला. या आंदोलनाला महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर, माजी महापौर संगीता अमृतकर, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण  काँग्रेस च्या अध्यक्षा चित्रा डांगे, उपाध्यक्षा सुनीता धोटे, चंद्रपूर शहर अध्यक्षा सुनीता अग्रवाल,
उपाध्यक्षा हर्षा चांदेकर, जिल्हा काँग्रेस अनुसूचित सेल च्या अध्यक्षा अनु दहेगवकर, कुंदा दिघीकर, माजी महापौर संगीता अमृतकर, ब्लॉक अध्यक्ष शीतल काटकर, माजी नगरसेविका उषा धांडे,सचिव ऍड. वाणी डारला, सहसचिव त्रिषणा वरगणे, उपस्थिती होत्या.