*_भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी साधले बुथ प्रमुखांन सोबत संवाद._*

29

*_भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी साधले बुथ प्रमुखांन सोबत संवाद._*

 

*_सौ.प्रतिमाताई ठाकूरदास सरकार यांची भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती._*

 

दिनांक :- २५/०९/२०२४

 

चामोर्शी :- आगामी विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी बूथ-बूथ चलो अभियानाला सुरुवात करून गावातील प्रत्येक बूथला भेट देऊन आढावा बैठक व बूथ प्रमुखांसोबत संवाद साधण्यास सुरुवात केले.

 

बूथ – बूथ चलो अभियान अंतर्गत प्रशांतजी वाघरे यांनी चामोर्शी तालुक्यातील जयनगर, चित्रांजनपुर व दुर्गापुर येथील बूथला भेट देऊन स्थानिक बूथप्रमुख व पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधले त्याप्रसंगी त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना आवाहन करत बोलले की, आगामी विधानसभा निवडणूक केव्हाही लागू शकतात त्याच पार्श्वभूमीवर गावातील बूथ प्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सतर्क राहणे फार गरजेचे आहे. त्यामुळे गावातील प्रत्येक बुथनिहाय बैठकीचे आयोजन करून 11 लोकांची बूथ कार्यकारणी करावे सोबतच महायुती सरकारने जनसामान्य,शेतकरी, महिलांसाठी विद्यार्थ्यांसाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरी जनतेपर्यंत पोहोचवा असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष वाघरे यांनी बूथ प्रमुखांना केले.

 

*_सौ.प्रतिमाताई ठाकूरदास सरकार यांची भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती.._*

 

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्या तथा ग्रामपंचायत जयनगरच्या सरपंच्या सौ. प्रतिमाताई ठाकूरदासजी सरकार यांना नियुक्तीपत्र देऊन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष या पदावर नियुक्ती केले.

 

त्याप्रसंगी प्रामुख्याने किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, जिल्हा उपाध्यक्ष रितेशजी पालारपवार, ओबीसी मोर्चा जिल्हा महामंत्री भास्करजी बुरे, दुर्गापुर गट ग्रामपंचायत सरपंच्या शनिताई मंडल, चामोर्शी शहर महामंत्री नरेशजी अलसावार, ठाकूरदाजी सरकार, किसान मोर्चा जिल्हा महामंत्री शेषरावजी कोहळे, बंगाली मोर्चा जिल्हा महामंत्री मनोरंजनजी हलदार, भाजपा ज्येष्ठ नेते डॉ.मोंटूलालजी हालदार, विष्णू ढाली, बंगाली मोर्चा तालुका महामंत्री दूलालजी मंडल, नीरज रामानुजनवार प्रदीप मंडल, कृष्णपथ मंडल, कृष्णा मंडल, बिनाय विश्वास, कृष्णा साणा, रीदय बाला, किशोर घरामी,गोपाल दास, मिथुनजय मंडल, भीमाशंकर मंडल बिजूभूषण मंडल, दिनेश मंडल, मादाय नयापती व स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.