*शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे खंबीर नेतृत्व मा.आमदार श्री सुधाकरराव अडबाले यांच्या उपस्थितीत तक्रार निवारण सभा संपन्न*
एकात्मिक आदीवासी प्रकल्प कार्यालय गडचिरोली येथे मा. आमदार सुधाकरजी अडबाले यांच्या प्रमुख उपस्थितीत तक्रार निवारण सभा संपन्न झाली यावेळी जिल्हा सरकार्यवाह अजयभाऊ लोंढे,गडचिरोली जिल्हा अनुदानित आश्रमशाळा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सतीश पवार,अहेरीचे श्री यादवराव धानोरकर,श्री.सुधीर झंजाळ, प्रकल्प कार्यालय गडचिरोली येथील सहायक प्रकल्प अधिकारी (प्रशासन ) श्री धनराज डबले , सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ प्रभू सादमवार , अनिल सोमनकर, मुख्या.श्री अजय बडगुजर , मुख्या.श्री हेमंत चुधरी , मुख्या.श्री सतीश कुंटेवार , मुख्या.श्री प्रशांत ताटपल्लीवार,श्री जितेंद्र दोडके इत्यादी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी नियमित 1 तारखेला वेतन ,माध्य.शिक्षकांची 4800 ग्रेड पे नुसार वेतन निश्चिती ,प्रलंबित पेंशन प्रकरणे ,प्रलंबित वैद्यकीय बिल , प्रलंबित G P F प्रकरणे ,सेवानिवृत्त प्रकरणे यावर सविस्तर चर्चा करून सर्व प्रकरणे मार्गी लावण्याचे निर्देश देण्यात आले .व सदर अहवालाची प्रत आपणास पाठवण्याच्या सूचना मा .आमदार महोदयांनी दिल्या.
या सभेला बहुसंख्य आश्रमशाळेतील शिक्षक व शक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.