शिवसेनेच्या प्रयत्नाने सिरोंचा ते सोमनुर बस सेवा सुरू

158

शिवसेनेच्या प्रयत्नाने सिरोंचा ते सोमनुर बस सेवा सुरू

किशोर पोतदार जिल्हा संपर्क प्रमुख यांनी सिरोंचा तालुक्यातील दोऱ्यावर असताना जनतेच्या समस्या जाणून घेतल्या आणि संबंधित अधिकारी वर्गाशी चर्चा करून तालुक्यातील समस्या सोडविल्या.

सिरोंचा : शिव जनसंपर्क अभियान अंतर्गत दौऱ्यात किशोर पोतदार जिल्हा संपर्क प्रमुख यांनी सिरोंचा तालुक्यातील जनतेच्या समस्या जाणून घेतल्या आणि तात्काळ मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकारी वर्गाशी चर्चा करून तालुक्यातील समस्या सोडविल्या. तालुक्यातील सोमनुर येथील ग्राम वासियांनी बस सेवा सुरू करण्यासंदर्भात मागणी केली.त्यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख यांनी दोन दिवसात बस सेवा सुरु करण्याचे आश्वासन ग्रामवासीयांना दिले.व लगेच संबधीत अधिकारी वर्गाशी चर्चा करून लगेच सिरोंचा ते सोमनुर बस सेवा सुरू केली.त्यामुळे सोमुरवासीयांनी शिवसेनेचे आभार मानले.या दौऱ्यात किशोर पोतदार जिल्हा संपर्क प्रमुख गडचिरोली यांचे सोबत राजगोपाल सुलवावार जिल्हाप्रमुख, रियाज शेख उपजिल्हाप्रमुख, अमित तिपटीवार तालुकाप्रमुख, विलास कोडाप जिल्हा संगठक,करुणा जोशी महिला आघाडी विधानसभा प्रमुख, नकुम गट्टू ग्रामीण तालुका प्रमुख, दुर्गेश तोकला तालुका समनव्यक, मुशर्रफ खान, किरण रिकुला,रितेश मनचाला,गणीभाई, वाहिदभाई, मेचनेनी, व सर्व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते शिव जनसंपर्क अभियान अंर्गत दौऱ्यावत सहभागी होऊन पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी व जनसमस्या सोडवण्यासाठी अथक परिश्रम घेतले.