*लाडक्या बहिणींचा मेळावा पोर्ला व अमिर्झा व  येथे ३ ऑक्टोंबरला*

13

*लाडक्या बहिणींचा मेळावा पोर्ला व अमिर्झा व  येथे ३ ऑक्टोंबरला*

 

*आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे लाडक्या बहिणींना उपस्थित राहण्याचे  आवाहन*

 

*पोर्ला येथे सकाळी ११ वाजता तर अमिर्झा येथे दुपारी २ वाजता होणार मेळावा*

 

*मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, वयोश्री योजना, तीर्थ दर्शन योजना, यांची  नोंदणी केली जाणार*

 

*दिनांक २ ऑक्टोंबर गडचिरोली*

*राज्याचे लाडके मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस (देवा भाऊ) यांच्या लाडक्या बहिणींचा मेळावा गडचिरोली तालुक्यातील पोर्ला व अमिर्झा जिल्हा परिषद क्षेत्रा अंतर्गत नियोजित करण्यात आला असून दिनांक ३ ऑक्टोंबर रोजी पोर्ला येथे सकाळी ११ वाजता तर अमिर्झा येथे दुपारी २ वाजता होणार आहे . तरी या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी  लाडक्या बहिणींना केले आहे.*

 

*हा मेळावा पोर्ला येथे शिवाजी शाळेच्या पटांगणावर सकाळी ११ वाजता होणार असून दुपारी २ वाजता   अमिर्झा येथील कर्मविर महाविद्यालयाच्या परिसरात  आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, वयोश्री योजना, तीर्थ दर्शन योजना, यांची नवीन नोंदणी करण्यात येणार आहे. तरी या मेळाव्याला लाडक्या बहिणींनी मोठ्या संख्येने  उपस्थित राहावे   असे आवाहन त्यांनी केले आहे.*