मेंडकी येथे पंचायत समिती सदस्य थानेश्वर पाटील कायरकर यांच्या हस्ते ओपन जिम चे भूमिपूजन

98

मेंडकी येथे पंचायत समिती सदस्य थानेश्वर पाटील कायरकर यांच्या हस्ते ओपन जिम चे भूमिपूजन

 मेंडकी २ मार्च : ब्रम्हपुरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्राम पंचायत मेंडकी येथे नाम.विजयभाऊ वडेट्टीवार, मंत्री,मदत व पुनर्वसन महाराष्ट्र राज्य,तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांचे अथक प्रयत्नाने ओपण जिम मंजुर झाले. या ओपण जिम चे भूमिपूजन ब्रम्हपुरी पंचायत समिती सदस्य थानेश्वर पाटील कायरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
मेंडकी गावांतील लोकसंख्या व स्थानिक युवकांची मागणी लक्षात घेऊन ग्रामपंचायत मेंडकी ने मा.नामदार विजयभाऊ वडेट्टीवार पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांचे कडे प्रस्ताव सादर केला होता. मा.नाम.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे मेंडकी येथील ग्रामपंचायत मध्ये ओपण जिम मंजूर करण्यात आले. त्या कामाचे दि.२मार्च २०२१ रोजी भूमिपूजन संपन्न झाला. यामुळे आता युवकांना व्यायाम करणे उत्तम सोईचे होणार आहे.
भूमिपूजनाच्या वेळी मेंडकी ग्रामपंचायत सरपंचा मंगलाताई ईरपाते, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र आंबोरकर, सचिन गुरनुले, सदस्या नयनाताई गुरनुले, मोक्षाली शेंडे, एकारा येथील सरपंच रमेश भैसारे, रामपुरी ग्रामपंचायत सदस्य उत्तम दोनाडकर, मधुकर कोरेवार, नामदेव गावतुरे, ग्रामविकास अधिकारी दिलीप शिंदे, रोजगार सेवक चंदु जेलेवार, अशोक मोहुर्ले, आंबोरकर, अशोक आंबोरकर, आदि उपस्थित होते.