साहेब, आमच्या टू व्हीलर वर बसून गावापर्यंत चला…   राहुल वैरागडे अध्यक्ष,युवा संकल्प

13

साहेब, आमच्या टू व्हीलर वर बसून गावापर्यंत चला…

राहुल वैरागडे अध्यक्ष,युवा संकल्प

 

एकोडी- कळमगाव मार्गाव पडले भगदाड : खा.नामदेव किसान साहेब लक्ष घ्या निवेदनातून मागणी.

 

चामोर्शी : तालुक्यातील एकोडी कळमगाव (फाटा) या अत्यंत वर्दळीच्या मार्गावर मोठे मोठे भागदारे पडलेले अजूनही याकडे शासन प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. रस्त्याची दुरुस्त झालेली असून या रस्त्याने आवागमन करताना जीव मुठीत धरून आवागमन करावे लागत आहे. दूचाकी ,सायकल, ट्रॅक्टर, आदी वाहनांनी प्रवास करताना कंबरट्याची अशी तैशी झाल्याशिवाय राहत नाही हे खरं आहे पण या मार्गावरून जाणारे

साहेब लोक फोर व्हीलर टूव्हीलरनेच जात असल्याने त्यांना धक्के बसत नाही.

त्यामुळे साहेब तुम्ही आमच्या टू व्हीलर वर बसून आमच्या गावापर्यंत प्रवास करायला या अशी एकोडी परिसरातील नागरिक घालत आहेत. प्रधानमंत्री सडक योजनेअंतर्गत काम झाले होते.पण अजून पर्यंत या ठिकाणी काम झाले नाही. हा मुद्दा संसदेमध्ये मांडा बरेच ग्रामीण भागात जाण्यास योग्य रस्ते नाही.काही भागात हा डांबरी रस्ता भकास झालेले आहे.अशी बादल धोटे,पंकज मडावी,मुखरू गेडाम,मुखरू भोयर ,किशोर धोटे,बालाजी जराते ,सचिन भोयर,राकेश मडावी,जीवन मडावी मागणी निवेदनातून केली आहे.