*लाडक्या बहिणींनी भाजप महायुतीच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहावे*

15

*लाडक्या बहिणींनी भाजप महायुतीच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहावे*

 

*महायुतीच्या उमेदवारांना निवडुन आणुन पुन्हा राज्यात महायुती सरकारची सत्ता स्थापन करूया.*

 

*भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे*

 

*गडचिरोली येथे लाडक्या बहिणींचा भव्य मेळावा*

 

*गडचिरोली:- दि.०२ ऑक्टोंबर*

 

*सर्वसामान्य जनतेसाठी व महिला सक्षमीकरण करण्यासाठी भाजपा महायुती सरकारने अनेक पावले उचलेले आहेत.विविध योजनांच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देत नवं उद्योजक व लखपती दीदी बनविण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी व महायुती च्या सरकारने केले आहे.त्यामुळे लाडक्या बहिणींनी भाजपा महायुतीच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहावे,व भाजपा महायुतीच्या उमेदवाराला निवडुन आणून पुन्हा राज्यात महायुतीची सरकार स्थापन करूया.असे प्रतिपादन भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांनी केले.*

*भारतीय जनता पार्टी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे लाडके आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी गडचिरोली शहराची राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस,देवाभाऊ यांच्या लाडक्या बहिणींचा मेळाव्याचे संस्कृती सांस्कृतिक सभागृह गडचिरोली येथे आयोजिन करण्यात आले होते.यावेळी लाडक्या बहिणीना मार्गदर्शन करतांना सौ.,योगीताताई पिपरे बोलत होत्या.*

*याप्रसंगी आमदार डॉ. देवरावजी होळी,जेष्ट नेते बाबुरावजी कोहळे व जेष्ट नेत्या प्रतिभाताई चौधरी यांनी लाडक्या बहिणींना मार्गदर्शन केले.*

*यावेळी मंचावर आमदार डॉ. देवरावजी होळी,भाजपा जेष्ट नेते बाबुरावजी कोहळे,विधानसभा निवडणुक प्रमुख इंजि. प्रमोदजी पिपरे, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे,महिला आघाडी शहर अध्यक्ष कविताताई उरकुडे, जेष्ट नेत्या प्रतिभाताई चौधरी, महिला आघाडी जिल्हा महामंत्री त्रिशाताई डोईजड, तालुका अध्यक्ष अर्चनाताई बोरकुटे,माजी नगरसेविका लताताई लाटकर,भाजपा जेष्ट नेत्या मांडवगडेताई,स्वातीताई चंदनखेडे उपस्थित होते.तसेच सभागृहामध्ये मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी उपस्थित होत्या*

*कार्यक्रम सुत्रसंचालन महिला आघाडी शहर महामंत्री पल्लविताई बारापात्रे यांनी केले.प्रास्ताविक शहर महामंत्री अर्चनाताई चन्नावार यांनी केले तर आभार माजी नगरसेविका वैष्णवीताई नैताम यांनी मानले.*