गट साधन केंद्र, एटापल्ली येथे दिव्यांग विद्यार्थ्यानासाहित्य वितरण

13

गट साधन केंद्र, एटापल्ली येथे दिव्यांग विद्यार्थ्यानासाहित्य वितरण-

दि. 04/10/2024

 

एटापल्ली समावेशित शिक्षणांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना गरजेनुसार विविध साहित्य पुरविण्याची समग्र शिक्षा अभियानाची एक योजना आहे. या अनुषंगाने गट साधन केंद्र, पंचायत समिती एटापल्ली च्या वतीने दिव्यागांना साहित्य वितरण करन्यात आले. दरम्यान, हे साहित्य पाहून दिव्यांगांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

 

सदर कार्यक्रमाल दिव्यांग व्हीलचेयर लहान – ०१ व्हीलचेयर मोठी-1 सी.पी. चेअर-04 अशा एकूण 14 साहित्यांचे वितरण करण्यात आले. साहित्य वितरण समारंभाच्या अध्यक्ष ठिकाणी श्री. निखिल कुमरे साहेब, गटसमन्वयक तथा शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती एटापल्ली हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री विनायक पुलकलवार सर, शिक्षण विस्तार अधिकारी ,विषम साधन व्यक्ती- श्री. उत्तरवार सर, भांडारकर सर, गजबेसर, झाडे मॅडम, आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. दरम्मान निखिल कुमरे तसेच पुरकलवार सर यांनी उपस्थित दिव्यांग विद्यार्थी व पालकां ना संबोधित केले. दरवर्षी दिव्यांगांच्या निश्चितीकरण व मोजमाप शिबिर आयोजित करण्यात येते व निवड झालेल्या गरजू विद्यार्थ्यांना त्याच्या गरजे नुसार शासन – स्तरावरून विनामुल्य हे साहित्य पुरविले जाते. हे विशेष.

 

संचालन विषय साधन व्यक्ती श्री. किशोर खोब्रागडे सर यांनी केले. तर आभार श्री दिलीप पुंगाटी विशेष तज्ज्ञ (समावेशित शिक्षण) यांनी मानले. यशस्वितेसाठी विशेष शिक्षक श्री. जिकार सर विषय साधन व्यक्ती श्री कोवे सर, शिपाई सौ. तारा सडमेक यांनी सहकार्य केलं.