*रामगिरी व नितेश राणे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी*

13

*रामगिरी व नितेश राणे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी*

 

*ब्रम्हपुरी मुस्लीम जमातचे मुख्यमंत्र्यांना निवेदन*

 

ब्रम्हपुरी/

रामगिरी व नितेश राणे यांच्या वादग्रस्त विधानांमुळे संतापलेल्या ब्रम्हपुरी मुस्लीम जमातने त्यांच्या विरोधात कडक कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. आज दिनांक ३ ऑक्टोंबर २०२४ रोजी ब्रम्हपुरी मुस्लीम समाजाने मुक मोर्चा काढुन उपविभागीय पोलिस अधिकारी व नायब तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर केले.

महाराष्ट्र राज्यात मागील काही काळात मुस्लीम समाजाविरूद्ध काहि धर्माधवादी संघटनांचे कार्यकर्ते, धार्मीक धर्मगुरू व भाजपाचे नेते यांचे कडुन मुस्लीम समाजाला त्रास देण्याचे काम सुरू आहे. लोकांचे घर,मस्जीदवर हल्ला करून तोडफोड करणे, मोहम्मद पैगंबर बद्दल आपत्ती जनक विधान करणे व मुसलमानांना मस्जीद मध्ये घुसुन मारू अशी चेतावणी पुर्ण विधान करणे सुरू आहे. शुल्लक कारणावरून मुस्लीम महिला, परूष तसेच मस्जीदचे मौलाना यांना वेठीस धरुन मॉबलींचींग करणे या कारणांमुळे मुस्लिम समाजातील लोक भयभीत झालेले आहेत.

मुस्लीम समाज हा शांती प्रिय समाज असून तो मोहम्मद पैगंबर यांची उम्मत आहे. तो मोहम्मद पैगंबर यांनी सुचविलेल्या प्रेमाचे मार्गावर चालणारा समाज आहे. आजपर्यंत या समाजाचे नेते, मौलाना, हाफीज़ किंवा सामान्य लोकांनी कोणत्या ही गैरमुस्लीम धर्माचे देवी- देवता, धर्मगुरूबद्दल आपत्ती जनक वक्तव्य करून त्यांचे भावना दुखावण्याचे कृत्य केलेले नाही. परंतू देशात व राज्यात मुस्लीम समाजाचे लोकांच्याप्रती काही विघटनकारी धर्माधवादी संघटनांनी लोकांमध्ये घृणा निर्माण करून त्यांचे विरुद्ध जो दुषीत वातावरण निर्माण केलेला आहे. त्यामुळे अशा घटना घडत आहे.

नुकतेच रामगीरी महाराज यांनी मुस्लीम समाजाचे मोहम्मद पैगंबरबद्दल जे आपत्तीजनक विधान केले आहे. त्या बद्दल व भाजपा आमदार नितीश राणे यांनी मुसलमानांना मस्जीदमध्ये घुसुन मारू असे आपत्ती जनक व भडकाऊ विधान केल्या बद्दल रामगिरी महाराज व नितेश राणे यांचेवर कायदेशीर कार्यवाही करून त्यांचे विरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी. या करीता दिनांक ३ ऑक्टोंबर २०२४ ला ब्रम्हपुरी मुस्लीम समाजाने हाताला काळी फित लावत मुक मोर्चा काढुन उपविभागीय पोलिस अधिकारी व नायब तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले. सोबतच राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना पण निवेदन देण्यात आले.

ब्रम्हपुरी मुस्लीम जमातच्या वतीने हा निवेदन सादर करताना वकार खान, अजमत पठाण, सज्जू जिवानी, इसराईल खान, गुलाम अली सय्यद, अशपाक शेख, जाकीर खान, जमिल सय्यद, हुसैन जिवानी, इकबाल जेसानी, सोहेल सय्यद, नफिस खान, गुफरान पटेल, जुनैद शेख, प्राचार्य शिरीन अन्सारी, सुकैना जिवानी, नदीम शेख, तौसीफ शेख, मोहसीन कुरैशी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.