*मुलांच्या चेहऱ्यावर फुलवले हसू आधारविश्व फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम*

17

*मुलांच्या चेहऱ्यावर फुलवले हसू आधारविश्व फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम*

 

गडचिरोली:-2-10-2024

 

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून आधारविश्व फाऊंडेशन तर्फे कमलापूर येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप*

 

गडचिरोली जिल्हयातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील स्थानिक शाळेत आधारविश्व फाऊंडेशन तर्फे विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

 

 

आधारविश्व फाऊंडेशन ही सामाजिक कार्यासाठी वाहिलेली नोंदणीकृत संस्था आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून अनेक समाजपयोगी कार्यक्रम राबविणाऱ्या आधारविश्व फाऊंडेशने आतापर्यंत कोरोना काळातील डबे पोहचविण्याची मदत असो, किंवा मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांचा आनंद असो, पूरग्रस्तांना मदत असो वा नक्षलग्रस्त भागात जिथे जाण्यासाठी अक्षरशः मार्गही उपलब्ध नाही, अशा ठिकाणी जाऊन तिथल्या ताईंच्या चेहऱ्यावर हसू उमलवणे असो, वा विधवा महिलांना सुद्धा एक प्रकारचा मान सन्मान मिळवून देणे असो, असे अनेक निरनिराळे उपक्रम आधारविश्व फाऊंडेशन नेहमीच राबवित असते.

 

काही दिवसापूर्वी आधारविश्व फाऊंडेशन च्या अध्यक्षा गीताताई हिंगे यांना नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळ्खल्या जाणाऱ्या कमलापूर येथील स्थानिक शाळेत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांजवळ आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांच्याजवळ शाळेसाठी दप्तर नाही, पहिले सत्र संपत आले तरी आर्थिक परिस्थिती मुळे विना दप्तरांनी शाळेत जात आहेत अशी माहिती तेथील सामाजिक कार्यकर्ते सुदीप रंगुवार यांनी दिली. हे ऐकून गरजूंसाठी सदैव धावणाऱ्या गीताताई हिंगे या अस्वस्थ झाल्या. लगेच यांनी त्या शाळेच्या एकूण 125 विद्यार्थ्यांसाठी स्कूल बॅग तसेच शैक्षणिक साहित्यांची व्यवस्था केली.

आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्या विद्यार्ध्यांना आधारविश्व फाऊंडेशन तर्फे स्कूल बॅग, नोट बुक आणि खाऊचे वाटप केले.

 

आज आपल्याला स्कूल बॅग मिळणार म्हणून सर्व विद्यार्थी आतुरतेने वाट बघत होते.आधारविश्व फाऊंडेशन च्या कार्यकर्त्या तिथे पोहचल्याबरोबर सर्वांना त्या सर्व विद्यार्थ्यांनी नाचत गाजत स्वागत करत शाळेपर्यंत नेले. ज्यावेळी त्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग चे वाटप करण्यात आले त्यावेळी त्या मुलांचा आनंद गगनात मावत नव्हता. आधारविश्व फाऊंडेशन च्या अध्यक्षा गीता हिंगे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलल्या की तुम्हाला मोठं होऊन काय बनायचं आहे ? प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापली आवड सांगितली.त्यावर गीताताई हिंगे म्हणाल्या आपापल्या क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर खूप अभ्यास करा खूप मेहनत करा आणि आईवडिलांचे नाव रोशन करा असे म्हणून त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अश्याप्रकारे त्या मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवून आधारविश्व फाऊंडेशन च्या कार्यकर्त्या परतीच्या प्रवासाला लागल्या.

यावेळी आधारविश्व फाऊंडेशन च्या वर्षाताई देशमुख ,मिराताई कोलते ,सीमाताई कन्नमवार, सुनीता ताई आलेवार तसेच शाळेचे शिक्षक वृंद गादसवार सर, आत्राम सर, कुभांरे सर, धारणीवार सर, बोलूवार सर तसेच तेथील सामाजिक कार्यकर्ते सुदीप रंगुवार व आधारविश्व फाऊंडेशनच्या अन्य सदस्या उपस्थित होत्या.