*लुबाडणुक नव्हे, निःस्वार्थ कामे करणाऱ्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहा!*
मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांचे आवाहन
*इंदाराम येथे जोरदार जनसंवाद कार्यक्रम*
*अहेरी*-जनसेवेच्या नावाखाली अशिक्षित, अडाणी लोकांना लुबाडणूक करणारे नव्हे तर, निःस्वार्थ व प्रामाणिक कामे करणाऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहा असे आवाहन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.
ते शनिवार 5 ऑक्टोबर रोजी अहेरी नजीकच्या इंदाराम येथे जनसंवाद व आढावा बैठकीत अध्यक्षीय स्थानावरून बोलत होते.
यावेळी मंचावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र बाबा आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बबलु भैय्या हकीम, कार्यकारी जिल्हा जिल्हाध्यक्ष रियाज शेख,अहेरी नगर पंचायतीचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, व्येंकटरावपेठा ग्राम पंचायतीचे उपसरपंच किशोर करमे, देवलमरी ग्रा.पं.चे सरपंच लक्ष्मण कन्नाके, नामदेव आत्राम, रा.काँ.चे अहेरी तालुकाध्यक्ष नागेश मडावी , तिरुपती मडावी, मनोज आत्राम, मांतया आत्राम, बालाजी गावडे, सांबय्या करपेत , सुरेश अनमोलवार, आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे, अध्यक्षीय स्थानावरून बोलतांना मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की, माझी स्वतःची जमीन या क्षेत्रातील सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या भविष्याचा विचार करून जमीन कंपनीला दान केले आहे. माझी भूमिका लोकांच्या जनहितार्थची असून स्वतःला जनसेवेचे मुलामा देऊन अशिक्षित, अडाणी लोकांचे दिशाभूल करून जमीनी कब्जा करण्याचा व लुटण्याचा सपाटा सुरू असून हे अत्यंत चिंताजनक व गंभीर बाब असल्याचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्यावर टीकेची झोड उडवून मंत्री ना. धर्मराव बाब आत्राम यांनी कंकडालवार यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करून गैरकारभाराचा पाढाच वाचले. आणि वर्षांनुवर्षे प्रामाणिक व निःस्वार्थ विधायक कामे करणाऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहा असे आवाहन केले. आणि अजून पुढे, मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी, केंद्र व राज्य सरकारचे लोकाभिमुख व लोककल्याणकारी योजनेचे लाभ घ्यावे असे म्हणत लाडकी बहीण योजना , लाडका भाऊ योजना, शेतकरी सन्मान योजना, उज्वला गॅस योजना व मुख्यतः अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील आदिवासी आणि गैरादिवासी वन जमिनीचे पट्टे, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना , प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना आदीचे लाभ सर्वांनी मिळवून घेण्याचे आवाहन करून मोलाचे मार्गदर्शन यावेळी केले.
जनसंवाद कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास कोरेत यांनी तर सुत्रसंचालन सुरेंद्र अलोणे यांनी केले. उपस्थितांचे आभार तिरुपती मडावी यांनी मानले. यावेळी बहुसंख्येने महिला भगिनी, युवक-युवती व नागरिक उपस्थित होते.