विदर्भ क्रिकेट संघटनेद्वारे १५ वर्षाखालील शालेय खेळाडूंसाठी (मुलं / मुली) निवड चाचणी

36

GDACA GADCHIROLI DISTRICT AMATURE CRICKET ASOSSICATION (Affiliated with VIDARBHA CRICKET ASSOCAITION NAGPUR)

विदर्भ क्रिकेट संघटनेद्वारे १५ वर्षाखालील शालेय खेळाडूंसाठी (मुलं / मुली) निवड चाचणी.

विदर्भ क्रिकेट संघटना नागपूर द्वारा आयोजित विदर्भातील सर्व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण विभागातील शाळेमधील प्रतिभावंत खेळाडूंचा शोध घेण्यासाठी व त्यांच्या गुणवतेला न्याय देण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये विदर्भ क्रिकेट संघटना तर्फे निवड चाचणी घेण्यात येणार आहे. या निवड चाचणीसाठी फक्त शाळेमधील १५ वर्षाखालील (मुलं / मुली) खेळाडूंसाठी निवड चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे. या निवड चाचणीसाठी नागपूर येथून विदर्भ क्रिकेट संघटनेचे निवड समितीचे सदस्य येणार आहेत. या निवड चाचणी करता कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क किंवा फी आकारण्यात येणार नाही याची नोंद जिल्ह्यातील सर्व खेळाडू व शाळांनी घ्यावी.

 

गडचिरोली जिल्ह्यातील शाळेच्या प्राचार्य / मुख्याध्यापक यांना सविनय कळविण्यात येत आहे की आपल्या शाळेतील इच्छुक क्रिकेट खेळाडूंची (मुलं / मुली) यादी शाळेच्या लेटर पॅडवर शाळेच्या क्रीडा शिक्षकाचे नाव व त्यांचा मोबाईल क्रमांक सह खेळाडूचे नाव, जन्म तारखेसह बोनाफाईड प्रमाणपत्र सोबत जोडून, गडचिरोली जिल्हा क्रिकेट संघटना सदस्यांना (श्री प्रशांत भूपाल, श्री आशिष बावनकुडे, श्री सचिन मडावी, श्री अनिल कल्कोत्वर्) यांचे कडे दिनांक 10/10/2024 पर्यंत जमा करावी.

 

तरी वरील निवड चाचणीसाठी सर्व शाळांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन विदर्भ क्रिकेट संघटना नागपूर जिल्हा समितीचे अध्यक्ष श्री शरद पाध्ये, गडचिरोली जिल्हा क्रिकेट संघटनेचे व विदर्भ क्रिकेट संघटनेचे जिल्हा संयोजक श्री मंगेश

 

देशमुख यांनी केले आहे.

 

निवड चाचणी खालील वयोगटातून करण्यात येईल १५ वर्षाखालील खेळाडू १/९/२००९ नंतर जन्मलेले व ३१/८/२०११ च्या पहिले वयोगट फक्त १३ ते १५ वर्ष.

 

Note: (निवड चाचणीची तारीख 13/10/2024 व वेळ 09:00 निवड चाचणीचे ठिकाण गडचिरोली जिल्हा स्टेडियम.) (पांढरा गणवेश आणि खेळाडूंचे स्वतःचे (क्रिकेट किट) साहित्य अनावे.)

 

महत्वाची कागदपत्रे (आधार कार्ड, संगणकीकृत जन्म प्रमाणपत्र)

 

प्रशांत भूपाल : 9834558529; आशिष बावनकुडे: 9860597252, अनिल कल्कोत्वर्ः 8275716949 सचिन मडावीः 9421786973