*राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न*

26

*राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न*

विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा झाली

*मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचे संकल्प केले*

*अहेरी:*- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष रियाज शेख यांच्या निवासस्थानातील पटांगणात शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाले आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांना निवडून आणण्याचे संकल्प करून रणनीती आखण्यात आले.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी युवा नेते तथा अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य रामेश्वरराव बाबा आत्राम हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून मंचावर आलापल्ली ग्राम पंचायतीचे सरपंच शंकर मेश्राम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते (अजित पवार गट)श्रीकांत मद्दिवार, राजेश्वर रंगुवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष रियाज शेख, विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार , तालुकाध्यक्ष नागेश मडावी, महिला जिल्हाध्यक्षा पुष्पाताई अलोणे, महिला तालुकाध्यक्ष सारिका गडपल्लीवार, अहेरी नगर पंचायतीचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, सुरेंद्र अलोणे, डेव्हिड बोगी, अरुण मुक्कावार, सोमाजी झाडे, कैलास कोरेत, पराग पांढरे , ग्रा.पं.सदस्य मनोज बोलूवार, सोमेश्वर रामटेके, महेश मोहुर्ले आदी मान्यवर उपस्थित होते.

आढावा बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीला राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांना अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रातून मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी रणनीती बैठकीत आखण्यात आले.

या प्रसंगी अध्यक्षीय स्थानावरून युवा नेते रामेश्वरराव बाबा आत्राम यांनी, येणाऱ्या दिवसात विधानसभेच्या निवडणुका लागणार असून मागील अनेक वर्षांपासून मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम अविश्रांत व अव्याहतपणे कार्य करीत असून विकासात्मक व विधायक कामे प्रत्येक घराघरांमध्ये व नागरिकांमध्ये पोहचविण्याचे आणि मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वांनी आतापासूनच कामाला लागावे असे म्हणत मोलाचे मार्गदर्शन यावेळी केले.

याच प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष रियाज शेख, महिला जिल्हाध्यक्षा पुष्पाताई अलोणे, आलापल्ली ग्राम पंचायतीचे सरपंच शंकर मेश्राम, अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, तालुका अध्यक्ष नागेश मडावी, सुरेंद्र अलोणे, रतन दुर्गे, मखमुर शेख आदींनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.