*गडचिरोली येथे हरियाणा व जम्मू कश्मीर मधील विजयाचा भाजपाने केला जल्लोष*

32

*गडचिरोली येथे हरियाणा व जम्मू कश्मीर मधील विजयाचा भाजपाने केला जल्लोष*

 

*आमदार डॉक्टर देवराव जी होळी व ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये फटाक्यांची आतिषबाजी*

 

*पेढे वाटून कार्यकर्त्यांनी साजरा केला आनंद*

 

*दिनांक ८ ऑक्टोंबर गडचिरोली*

 

*देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी ,राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाशजी नड्डा ,केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या नेतृत्वात हरियाणा मध्ये मिळालेल्या स्पष्ट बहुमताच्या विजयासह काश्मीरमधील मिळवलेल्या प्रचंड यशाचा जल्लोष आमदार डॉक्टर देवरावजी होळी व ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात फटाक्याची आतिषबाजी करून व पेढे वाटून साजरा करण्यात आला.*

 

*यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी भारत मातेचा जयजयकार केला . हा पार्टी नेतृत्वाने केलेल्या यशस्वी नियोजनाचा विजय असल्याचे प्रतिपादन आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी यावेळी केले.*

 

*शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, गडचिरोली तालुक्याचे अध्यक्ष विलासजी  भांडेकर, धानोरा तालुक्याच्या अध्यक्ष लताताई पुंघाटी, भाजपा जिल्हा सचिव दिलीप भाऊ चलाख ,साईनाथ भाऊ बुरांडे, पंचायत समितीचे माजी सभापती मारोतराव इचोडकर, उपसभापती विलासजी दशमुखे , युवा मोर्चा जिल्हा महामंत्री मधुकरराव भांडेकर, ज्येष्ठ नेते जयरामजी चलाख, तालुक्याचे महामंत्री बंडूभाऊ झाडे ,शहराचे मंत्री महामंत्री विवेक बैस ,नरेश भाऊ हजारे विनोद भाऊ देवोजवार, महामंत्री केशव निंबोड, शहर महिला आघाडी अध्यक्ष कविता ताई उरकुडे, तालुक्याच्या महिला आघाडी अध्यक्ष अर्चनाताई बोरकुटे ,  धानोऱ्या शहराचे अध्यक्ष सारंग साळवे, नगरसेवक संजू कुंडू यांचे सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.*