*आरमोरी तालुका आदिवासी फेडरेशनकडून डॉ. शिलू चिमूरकर यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा*

35

*आरमोरी तालुका आदिवासी फेडरेशनकडून डॉ. शिलू चिमूरकर यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा*

 

आरमोरी: आरमोरी तालुक्यातील आदिवासी फेडरेशनच्या प्रमुख नेत्यांनी आज डॉ. शिलू ताई चिमूरकर यांच्या आमरण उपोषण स्थळी भेट देत त्यांना आपला ठाम पाठिंबा दर्शविला. डॉ. चिमूरकर यांच्या उपोषणाचा उद्देश धनगर आणि गैर-आदिवासींना अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणात प्रवेश रोखण्यासाठी तसेच आदिवासी समाजाच्या न्याय हक्कांचे रक्षण करण्यासाठी आहे.

 

या वेळी आदिवासी फेडरेशनचे डॉक्टर नीलकंठ मसराम, नरेंद्र कुमार कोकुर्डे, प्रकाश पंधरे, सुभाष पेंदाम, प्रदीप सिडाम आणि विकास सिडाम यांची उपस्थिती होती. आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी एकजूट दाखवत, त्यांनी या संघर्षात डॉ. चिमूरकर यांना संपूर्ण पाठिंबा देण्याचे वचन दिले. त्यांच्या या एकतेमुळे आदिवासी समाजाच्या हक्कांसाठीचा लढा आणखी बळकट होणार आहे.