e-EPIC डाउनलोड करण्याबाबत विशेष शिबीर

175

e-EPIC डाउनलोड करण्याबाबत विशेष शिबीर

गडचिरोली(जिमाका दि .०३ मे) : भारत निवडणूक आयोगाव्दारा, ज्या मतदाराने त्याचा एकल (Unique) मोबाईल क्रमांक नोंदविलेला आहे. अशा मतदारांना e-EPIC डाउनलोड करण्याची सुविधा राष्ट्रीय मतदान सेवा पोर्टल (NATIONAL VOTER’S SERVICES PORTAL) व मतदार सहाय्यता ॲपव्दारा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्रातील निर्धारीत स्थळे / मतदान केंद्रावर दिनांक 06.03.2021 (शनिवार) व 07.03.2021 (रविवार) या दोन दिवशी e-EPIC डाउनलोड करण्याबाबत विशेष शिबीर आयोजित केलेले आहे.
तरी सदरच्या e-EPIC डाउनलोड करण्याबाबत विशेष शिबीराचा लाभ सर्व नविन मतदारांनी घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.