जहाल माओवादी दाम्पत्याने केले गडचिरोली पोलीस व सीआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण

24

 

जहाल माओवादी दाम्पत्याने केले गडचिरोली पोलीस व सीआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण

 

 

श्व् शासनाने जाहिर केले होते एकुण 08 लाख रूपयांचे बक्षिस.

 

शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 676 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. आज दिनांक 19 ऑक्टोंबर 2024 रोजी जहाल माओवादी नामे 1) असिन राजाराम कुमार ऊर्फ अनिल ऊर्फ गगनदीप ऊर्फ निशांत ऊर्फ सुशांत, एरीया कमिटी मेंबर (एसीएम) प्रेस टिम (ओडिशा) वय 37 वर्ष, मुळ पत्ता – रा. मंडीकला ता. नरवाना जि. जिंद (हरियाणा) व सध्याचा पत्ता – रा.सुन्नी ता. सुन्नी जि. शिमला (हिमाचल प्रदेश) व त्याची पत्नी नामे 2) अंजू सुळया जाळे ऊर्फ सोनिया ऊर्फ जनिता, दलम सदस्य, प्रेस टिम (ओडिशा), वय 28 वर्षे, रा. गुरेकसा, ता. धानोरा, जि. गडचिरोली व सध्याचा पत्ता – रा.सुन्नी ता. सुन्नी जि. शिमला (हिमाचल प्रदेश) या जहाल माओवादी दाम्पत्याने गडचिरोली पोलीस व सीआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण केले.

 

आत्मसमर्पित जहाल माओवादी सदस्यांबाबत माहिती

 

1) असिन राजाराम कुमार ऊर्फ अनिल ऊर्फ गगनदीप ऊर्फ निशांत ऊर्फ सुशांत

 दलममधील कार्यकाळ

 

श्व् शालेय जीवनात बालदस्ता या संघटनेमध्ये त्याची विशेष रुची होती. तो जिंद (हरियाणा) येथे असतांना जागृत छात्र मोर्चामध्ये राज्य समिती सदस्य म्हणून त्याने उत्तर प्रादेशिक ब्युरोसाठी काम केले.

श्व् सन 2006 मध्ये माड एरीया प्रेस टिममध्ये भरती होऊन सन 2011 पर्यंत सदस्य पदावर कार्यरत.

श्व् सन 2011 मध्ये प्रेस टिममधून कंपनी 10 मध्ये बदली होऊन सन 2013 पर्यंत एसीएम पदावर कार्यऱत.

श्व् सन 2013 मध्ये कंपनी 10 मधून प्रेस टिम (ओडिशा) मध्ये बदली होऊन सन 2018 पर्यंत कार्यरत.

श्व् सन 2018 ते आजपावेतो हिमाचल प्रदेश राज्यामध्ये राहुन उदरनिर्वाह करत होता.

 

 कार्यकाळात केलेले गुन्हे

श्व् चकमक – 02

 

 सन 2013 मध्ये उदंती (ओडिशा) जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग.

 सन 2014 मध्ये ओडिशा येथील जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग.

 

 

 आत्मसमर्पित होण्याची कारणे.

 

 कोणतेही शासकिय ओळखपत्र नसल्यामुळे विविध अडचणींचा सामना करावा लागत होता.

 बरेच माओवादी सरेंडर व अटक झाले असल्यामुळे कधीही नाव उघडकीस येऊन अटक होण्याची भिती वाटत होती.

 सतत खरी ओळख लपवून राहणे व सतत खोटे बोलणे अशक्य झाले होते.

 त्याने गडचिरोली (महाराष्ट्र) येथे सशस्त्र संघटनेत यापुर्वी काम केले असल्यामुळे व इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र राज्याची आत्मसमर्पण योजना सर्वात चांगली वाटल्यामुळे महाराष्ट्रामध्ये सरेंडर करण्याचा निर्णय घेतला आहे.

2) अंजू सुळया जाळे ऊर्फ सोनिया ऊर्फ जनिता

 दलममधील कार्यकाळ

 

श्व् सन 2007 मध्ये टिपागड दलममध्ये कमांडर दिनकर याची मदतनीस म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

श्व् सन 2008 मध्ये राही दलममध्ये बदली होऊन जून 2009 पर्यंत सदस्य पदावर कार्यरत.

श्व् सन 2010 ते 2012 पर्यंत माड एरीयातील मौजा घमंडी (छ.ग.) गावात जनताना सरकारच्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम केले.

श्व् सन 2012 मध्ये कंपनी क्र. 10 मध्ये बदली होऊन सन 2013 पर्यंत सदस्य पदावर कार्यरत.

श्व् सन 2013 ते 2018 पर्यंत ओडिशा राज्यात बदली होऊन प्रेस टिममध्ये हिंदी आणि गोंडी भाषेचे टंकलेखक म्हणुन काम केले.

श्व् सन 2018 ते आजपावेतो हिमाचल प्रदेश राज्यामध्ये राहुन उदरनिर्वाह करत होती.

 

 

 कार्यकाळात केलेले गुन्हे

श्व् चकमक – 02

 

 सन 2012 मध्ये मौजा लाहेरी जंगल परिसरात लाहेरी पोलीस पार्टीसोबत झालेल्या चकमकीत तिचा प्रत्यक्ष सहभाग होता.

 सन 2013 मध्ये उदंती (ओडिशा) जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग.

 

 

 आत्मसमर्पित होण्याची कारणे.

 

 कोणतेही शासकिय ओळखपत्र नसल्यामुळे विविध अडचणींचा सामना करावा लागत होता.

 बरेच माओवादी सरेंडर व अटक झाले असल्यामुळे कधीही नाव उघडकीस येऊन अटक होण्याची भिती वाटत होती.

 सतत खरी ओळख लपवून राहणे व सतत खोटे बोलणे अशक्य झाले होते.

 तिने गडचिरोली (महाराष्ट्र) येथे सशस्त्र संघटनेत यापुर्वी काम केले असल्यामुळे व इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र राज्याची आत्मसमर्पण योजना सर्वात चांगली वाटल्यामुळे महाराष्ट्रामध्ये सरेंडर करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

 

 

 शासनाने जाहिर केलेले बक्षिस.

 

 

श्व् महाराष्ट्र शासनाने असिन राजाराम कुमार ऊर्फ अनिल ऊर्फ गगनदीप ऊर्फ निशांत ऊर्फ सुशांत याचेवर 06 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

श्व् महाराष्ट्र शासनाने अंजू सुळया जाळे ऊर्फ सोनिया ऊर्फ जनिता हिचेवर 02 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

 

 

 आत्मसमर्पणानंतर शासनाकडून मिळणारे बक्षीस.

 

 आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन असिन राजाराम कुमार ऊर्फ अनिल ऊर्फ गगनदीप ऊर्फ निशांत ऊर्फ सुशांत याला एकुण 05 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

 आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन अंजू सुळया जाळे ऊर्फ सोनिया ऊर्फ जनिता हिला एकुण 4.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

 आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता राज्य शासनाकडुन पती पत्नी असलेले माओवादी सदस्य यांनी आत्मसमर्पण केल्यास एकत्रित अतिरिक्त मदत म्हणून 1.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे. असे एकुण 11 लाख रुपयांचे बक्षिस शासनाकडुन जाहिर करण्यात आले.

 

 

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते 2024 सालामध्ये आतापर्यंत एकुण 29 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सदर माओवाद्यांचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कार्यवाही श्री. संदिप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपुर, श्री. अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र, श्री. अजय कुमार शर्मा, पोलीस उपमहानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ, श्री. नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली, श्री. सुमीत कुमार उप-कमांडंट, रेंज फिल्ड टिम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­या माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा.