अंकुशजी मंडलवार शिवसेना प्रसिद्धी उपजिल्हा प्रमुख तथा शिवसेना कामगार संघटना अहेरी तालुका यांचे घरी भेट

28

अहेरी इस्टेट चे राजे तथा माजी गडचिरोली जिल्हा पालकमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते आदरणीय अंब्रीशराव महाराज आत्राम यांनी आलापल्ली येथील मोदुमडगू या परिसरामध्ये दिनांक १९ आक्टोबर २०२४ रोज शनिवार ला, एका कार्यक्रमानिमित्ताने, आले असता.त्यांनी वेळात वेळ काढून श्री.अंकुशजी मंडलवार शिवसेना प्रसिद्धी उपजिल्हा प्रमुख तथा शिवसेना कामगार संघटना अहेरी तालुका यांचे घरी भेट देऊन,सविस्तर चर्चा केली, श्री.मंडलवार यांनी मोदुमडगू परिसरातील काही समस्या त्यांच्यासमोर मांडल्या तसेच आपल्या आलापल्ली परिसरातील सुशिक्षित बेरोजगारांना सुरजागड येथे रोजगार मिळत नसल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले. या सर्व समस्या घेऊन आपण सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन माजी मंत्री आदरणीय अंब्रीशराव महाराज आत्राम यांनी दिले. यावेळी शिवसेना-भाजपा पक्षाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.