यवतमाळ जिल्ह्यात एकाच दिवशी 215 जण कोरोनामुक्त

112

एकाच दिवशी 215 जण कोरोनामुक्त

 दोन मृत्यु, 155 जण नव्याने पॉझेटिव्ह

यवतमाळ, दि. 3 : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी बरे होणा-यांची संख्या सुध्दा जास्त आहे. गत 24 तासात वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 215 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर जिल्ह्यात दोन मृत्युसह 155 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळातील 74 वर्षीय आणि बाभुळगाव तालुक्यातील 73 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. बुधवारी पॉझेटिव्ह आलेल्या 155 जणांमध्ये 99 पुरुष आणि 56 महिलांचा समावेश आहे. यात यवतमाळातील 45, पुसद 45, बाभुळगाव 15, दिग्रस 14, आर्णि 9, पांढरकवडा 7, नेर 6, मारेगाव 4, दारव्हा 3, कळंब 2, राळेगाव 2, उमरखेड 1, वणी 1 व इतर 1 रुग्ण आहे.
बुधवारी एकूण 942 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 155 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 787 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1741 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 18241 झाली आहे. 24 तासात 215 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 16031 आहे. तर जिल्ह्यात एकूण 469 मृत्युची नोंद आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 166387 नमुने पाठविले असून यापैकी 165285 प्राप्त तर 1102 अप्राप्त आहेत. तसेच 147044 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.
००००००