*जिंकून येणाऱ्या  आमदार डॉक्टर देवराव होळींनाच उमेदवारी द्या*

20

*जिंकून येणाऱ्या  आमदार डॉक्टर देवराव होळींनाच उमेदवारी द्या*


 

*शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस व आमदार होळी मित्रपरिवारातील नेत्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेतून एकमुखाने मागणी*

 

*२५ ऑक्टोंबरला भाजपा,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस व   आमदार डॉक्टर देवराव होळी मित्रपरिवाराच्या २५ हजार कार्यकर्त्यांचा मेळावा गडचिरोली येथे होणार*

 

*दिनांक २१ ऑक्टोंबर गडचिरोली*

 

*आमदार डॉक्टर देवरावजी होळी  यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात यापूर्वी कधीच न झालेला विकास  करून दाखवलेला आहे . त्यांनी भाजपासोबतच मित्र पक्षांच्या सर्व नेत्यांना सोबत घेऊन या ठिकाणी काम केलेले आहे त्यामुळे विकास कामाच्या आधारावर त्यांचा विजय निश्चित आहे करिता जिंकून येणाऱ्या डॉक्टर देवराव होळींनाच आमचा पाठिंबा असून  भारतीय जनता पार्टीने आमदार डॉक्टर देवराव होळी यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस  व आमदार डॉक्टर देवराव होळी मित्र परिवाराच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली.*

 

*दिनांक २५ ऑक्टोंबरला  शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस व   आमदार डॉक्टर देवराव होळी मित्रपरिवाराच्या २५ हजार कार्यकर्त्यांचा मेळावा गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.*

 

*पत्रकार परिषदेला शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश भाऊ बेलसरे ,उपजिल्हाप्रमुख हेमंत भाऊ जंबेवार , राष्ट्रवादी काँग्रेसचे नामदेवजी दुधबळे लौकिक भिवापूरे, भाजपा जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे , शहराच्या अध्यक्षा कविताताई ऊरकुडे, पंचायत समिती सभापती मारोतराव इचोडकर , प स उपसभापती विलास दशमुखे, ज्येष्ठ नेत्या प्रतिभाताई चौधरी, पल्लवीताई बारापात्रे, विधानसभा प्रमुख रोशनभाऊ मसराम, दीपक भारसाकडे युवासेना जिल्हा प्रमुख, जिल्हा सचिव दिलीप चलाख , साईनाथजी बुरांडे, चामोर्शी तालुका प्रमुख पप्पी पठाण, तालुकाप्रमुख सोपान म्हशाखेत्री , ज्येष्ठ नेते जयराम चलाख, धानोरा महिला आघाडी प्रमुख वरगंटीवार ताई , आतिश मिस्त्री बंगाली आघाडी जिल्हाप्रमुख, युवा सेना उपजिल्हाप्रमुख सागर भांडेकर, यांचे सह २०० हून अधिक पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.*

 

*आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी शासनाशी , प्रशासनाशी संघर्ष करून अखेर जिल्हयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणले . यामुळे जिल्ह्यात वैद्यकीय सोयी सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार असून जिल्ह्यातील स्थानिकांनाही वैद्यकीय शिक्षण घेणे सोयीचे झाले आहे. कोटगल बॅरेज , अनेक उपसा सिंचन योजना आणून शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनाची मोठी सुविधा उपलब्ध करून दिली, जिल्ह्याने उद्योग क्षेत्रात उंच भरारी घेतली,  जिल्ह्यात रस्ते पुलांसाठी शेकडो कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. जिल्ह्यात मागील ५० वर्षात न झालेली विकासकामे   करून  या क्षेत्राचा कधी नव्हे एवढा विकास करून दाखवलेला आहे.*

*अशा विकासाची दृष्टी असणाऱ्या आमदार डॉक्टर देवराव होळी यांना निवडणुकीत पराभूत करणे इतर कोणत्याही पक्षांना कठीण आहे . त्यामुळे आमदार होळी हे जिंकून येणारे उमेदवार आहेत करिता भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने निवडणुकीत जिंकून घेण्याची क्षमता असणाऱ्या डॉ होळीनाच उमेदवारी द्यावी. अशी मागणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली.*