*रानटी हत्तीने नुकसान झालेल्या शेतपिकाची आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी केली पाहणी*

10

*रानटी हत्तीने नुकसान झालेल्या शेतपिकाची आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी केली पाहणी*

 

*शेतकऱ्यांना नुकसानग्रस्तांना नुकसानीची भरपाई देण्याची केली मागणी*

 

*हत्तींचा मोठा झुंड काटली, पिपर टोला येथे अचानक आल्याने लोकांमध्ये दहशत*

 

*दि. 23 ऑक्टोबर 2024*

 

*गडचिरोली तालुक्यामध्ये मागील काही दिवसांपासून रानटी हत्तींनी प्रचंड धुडगूस घातला असून शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे. त्यामुळे जीवितहानीची ही शक्यता बळावलेली आहे करिता भविष्यात होणारी वित्त व जीवित हानी टाळण्यासाठी वनविभागाने या रानटी हत्तींचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी वनविभागाकडे केली आहे.*

 

*यावेळी सरपंच भारती फुलझेले, माजी उपसभापती विलास दशमुखे, राजेंद्र मुरतेली, खुशाल चुधरी, रत्नाकर रंदये, दिलिप रंदये, किशोर रंदये, कवळू रंदये, उत्तम रंदये, गणपत मेश्राम, मनोहर मेश्राम, लालाजी मेश्राम,आनंदराव मडावी, कार्तिक नैताम, नामदेव मेश्राम वासुदेव मेश्राम तसेच नुकसान ग्रस्त शेतकरी उपस्थित होते*