गोंडपिपरीच्या रासबिहारी जिनींगला भिषण आग

234

गोंडपिपरीच्या रासबिहारी जिनींगला भिषण आग

करोडो रूपयाचे नुकसान

गोंडपिपरी :- गोंडपिपरीतील धानापूर परिसरात असणाऱ्या रासबिहारी जिनींगला आज दुपारी भिषण आग लागली. यात करोडो रूपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केल्या जात आहे.आग विझविण्यासाठी चंद्रपूर, बल्लारपूर,राजूरा, पोंभुर्णा, अहेरी येथील सहा अग्नीशामक दलाच्या गाडयांना पाचारण करण्यात आले.तोपर्यत आगीने रूद्र रूप धारण केले.घटनेची माहिती कळताच तहसिलदार के.डी.मेश्राम यांनी घटनास्थळी भेट दिली व नुकसानीचा आढावा घेतला.आगीच्या घटनाची माहिती कळताच अनेकांनी धावाधाव केली.यादरम्यान झालेल्या अपघातात एका मजुराचा पायाला गंभीर दुखापत झाली.त्याला उपचारासाठी गोंडपिपरीच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.हि जिनींग प्रेमलता गोनपल्लीवार,आनंदीदेवी सारडा यांच्या मालकीची आहे.