*जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल‌‌‌) येथे मतदान जनजागृती रॅली.*. 

13

*जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल‌‌‌) येथे मतदान जनजागृती रॅली.*.  *मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदान जनजागृती अभिनव उपक्रम*. 👉▪️स्थानिक चामोर्शी पं.स.अंतर्गत मुरखळा (माल) गावात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल) शाळेच्या वतीने दिनांक २५/१०/२०२४ रोज शुक्रवार ला शिक्षक व विद्यार्थ्यांकडून रॅली काढत मतदान विषयक जनजागृती करण्यात आली.शिक्षक व विद्यार्थ्यांनी गावातील मुख्य चौकातून रॅली काढून *मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो.* *सोडा सारे काम धाम,मतदान करणे पहिले काम.*मतदानासाठी वेळ काढा,आपली जबाबदारी पार पाडा* यांसारख्या घोषणा देत गावातील मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.या रॅलीमध्ये एक ते सात वर्गाचे सर्व विद्यार्थी,शिक्षकवृंद उपस्थित होते.याप्रसंगी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल‌‌‌)चे मुख्याध्यापक श्री गणेश बोईनवार सर,पदवीधर शिक्षक तथा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री रघुनाथ भांडेकर सर,सहायक शिक्षक श्री अशोक जुवारे सर, श्री चंद्रकांत वेटे सर,श्री जगदीश कळाम सर,श्री राजकुमार कुळसंगे सर,श्री कमलाकर कोंडावार सर,सौ.सोनिताई संदोकार मॅडम आदींची उपस्थिती होती.