विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने मतदान प्रक्रियेत गैरप्रकार रोखण्यासाठी
तीन स्थिर सर्वेक्षण पथकांची नेमणूक
गडचिरोली,(जिमाका)दि.26: महाराष्ट्र सार्वत्रिक विधानसभा निवडणूक -2024 चा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेला असून दि. 15 ऑक्टोबर 2024 पासून आचारसंहितेची अंमलबजावणी सुरु झालेली आहे. दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडणाऱ्या मतदान प्रक्रियेत गैरप्रकार रोखण्यासाठी 67- आरमोरी (अ.ज.) विधानसभा मतदार संघामध्ये तीन स्थिर सर्वेक्षण पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. पोलीस विभाग, पंचायत समिती कार्यालय, कृषी विभाग आदी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आरमोरी- ब्रम्हपुरी रोडवर वैनगंगा नदीच्या पुलाजवळ, वडसा-अर्जुनी मोरगाव रोडवर वनविभाग नाक्याजवळ आणि वडसा – लाखांदूर रोडवर सावंगी गावाजवळ सदर पथक कार्यान्वित झालेले आहेत. त्याचसोबत मतदारांना भयमुक्त वातावरणात मतदान करता यावे यासाठी तीन फिरते सर्वेक्षण पथकांची आणि चार चित्रफिती सर्वेक्षण पथकांची नेमणूक करुन ते देखील कार्यान्वित करण्यात आले आहेत. आचारसंहिता अंमलबजावणी कक्षाचे नोडल अधिकारी रमेश कुमरे, तहसिलदार कुरखेडा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पथकांचे कार्य सुरु आहे. असे स्विप व मीडिया नोडल अधिकारी 67- आरमोरी (अ.ज.) विधानसभा मतदार संघ स्थित देसाईगंज, प्रणाली खोचरे यांनी कळविले आहे.
0000