सिरोंचा येथील किराणा दुकान कडकडीत बंद

197

सिरोंचा येथील किराणा दुकान कडकडीत बंद

●जीवनावश्यक वस्तूसाठी नागरिकांचा भटकंती

सिरोंचा ता प्र:- साधा तंबाखू,चुना साधा सुपारी,सिगारेट बिडी,नस मंजन इत्यादी वस्तू अन्न व औषध प्रशासन विभाग विकण्यास कोणत्याही मनाई नाही म्हणून सांगितले परंतु सिरोंचा गावातील व्यापारांना मुक्तीपथ तालुका संघटक सुनिता भगत यांच्याकडून वारंवार दुकानात शिरून प्रत्येक वस्तूची पडताळणी करणे शिवीगाळ करणे धमकावत आहेत त्यामुळे मानसिक त्रास आणि शारीरिक त्रास होत आहे असे निवेदनात म्हटले आहे शासनाकडून योग्य निर्णय येईपर्यंत दुकान बंद ठेवू असा व्यापाराने ठोस निर्णय घेतला आहे शासनाकडून कोणत्या वस्तू बंद आहे कोणत्या वस्तू नाही आम्हाला सविस्तर लेखी स्वरूपात देण्यात यावी अशी ही निवेदनात म्हटले काल प्रभारी तहसीलदार हमीद सय्यद यांना निवेदन सादर करण्यात आले निवेदन सादर करताना सिरोंचा येथील व्यापारी ओमप्रकाश ताटीकोंडावार, मनोज कलकोटवार,मुकेश गुज्जावार, संतोष ओल्लालवार, अशोक विश्वनाथुल वार, विजय मंचालवार, व्यंकटेश रेपालवार,मनोज चकिनारपूवार,अनिल ओल्लालवार, गिरीश चिल्कामारे,मांतेश बुद्धावार,रवि चकिरपूवार, राजन्ना बुद्धावार,मनीष गुज्जावार, जितू आडेपु,दयानंद गादेवार, रमेश मुंगीवार, चंद्रशेखर गंटेवार,श्रीनिवास चिंतावार आदी व्यापारी उपस्थित होते