आलापली ते गुडीगुडंम राष्ट्रीय माहामार्गावर मुरुमचा 10 mm लेप लावत मातीचा वापर

62

आलापली ते गुडीगुडंम राष्ट्रीय माहामार्गावर मुरुमचा 10 mm लेप लावत मातीचा वापर

 

धूळफेक : ३५३ सी राष्ट्रीय महामार्गाचा ८ वर्षानंतर पहिल्यांदाच काम

 

गडचिरोली : आलापली – सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावर वरील आलापली ते गुडीगुडंम या मुख्य रस्त्याच्या कामात मुरुमाऐवजी मातीचा वापर केला जात असल्याचे उघड झाले आहे. यामुळे कामाच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला असून, चौकशीची मागणी होत आहे.

 

सदर महामार्गावर कंत्राटदाराने शासनासोबत केलेल्या ईपीसी मोडच्या करारनाम्यानुसार काम न करता आपल्या मनमर्जीने करत असल्याचे दिसून येत आहे.500mm खोदकाम करून 300 mm मुरूम टाकने अनिवार्य असताना एकही सब ग्रेड मुरूम फक्त 10ते 20 mm मुरूम वापरत माती वर केला जात आहे,आणि जीएसबी 200 एम एम थिकनेस असताना निवड 80 ते 90 एम एम थिकनेसचा वापरून काम केल्या जात आहे. व सदर कंत्राटदाराने काम हातात घेत असताना ज्या कोणत्या यंत्रसामग्री मशनरी प्लांट डीटीपी मध्ये नमूद केले आहे. असे कोणतेही यंत्रसामग्री न वापरता. मजूर लावून म्यांवली काम करत आहे.व a R.M C .plant nahi .byach mix plant nahi.

 

आलापल्ली सिरोंचा या मार्गाला २०१७/२०१८, या वर्षात राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला असून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 सी या मार्गाचा ८ वर्षा नंतर होत असलेल्या कामाची ही स्थिती असल्याने निधीचा कसा चुराडा होत आहे, हे समोर आले आहे.

 

अल्लापल्ली ते गुडीगुडम माहामार्गावर मुरूम ऐवजी मातीचा वापरण्यात येत आहे. या कामावर संबंधित विभागाचे अधिकारी व कन्सल्टन्सी भेट देत नाहीत, व आपल्या सोयीनुसार व्हिजिट करून जात असतात त्यामुळे कंत्राटदाराची मनमानी सुरू असल्याचे चित्र आहे.

 

आलापली सिरोंचा या मार्गावरून आलापली ते गुडीगुडंमला जोडणारा १६ km किमीचा रस्ता एकूण 57 कोटी रुपये इतका आहे. हा राष्ट्रीय महामार्ग ८ वर्षानंतर पहिल्यांदाच होत आहे. यामुळे या निधीतून दर्जेदार काम होणे गरजेचे आहे. मुरुमाऐवजी मातीचा वापर होत असल्याने रस्ता किती दिवस टिकेल, असा प्रश्न निर्माण होत आहे

 

आलापली गुडीगुडंम या १६ km, किलोमीटर रस्ता कामाच्या मार्गावरच सदर कंत्राटदाराचे सोयी सुविधा पूर्ण अशी मशनरी असलेले प्लांट असावे जेणे करून रस्ता कामाची गती वाढेल आणि काम ही उतम्म दर्जेचे होतील. पण अस न करता सदर कंत्राटदार रस्त्याच्या कामावर रस्त्याच्या आजूबाजूला खोदकाम करून मुरूम न टाकताच निघालेल्या मातीवरच लेवलींग – डोजिंग करून सदर कंत्राटदारांकडून हे रस्त्याचे काम दिवसा न करता रात्रौचा फायदा घेत मुरूम न टाकता मातीवरच लेवलींग – डोजिंग करून रात्रीच बाहेर राज्यातून रस्त्ता कामावरील मटेरियल टिपर गाड्यांनी आणून टाकला जात आहे.

 

तरी हा काम थांबून या कामाची चौकशी करण्याची मागणी संतोष ताटीकोंडावार यांनी केली असून सदर रस्ता राष्ट्रीय महामार्ग असून

या कामाला अधिकाऱ्यांनी वेळोवेळी भेटी देणे आवश्यक आहे. मात्र, अधिकारी सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसून राहिले त्यामुळे चौकशी करणे गरजेचे आहे. व संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अन्यथा त्यांच्याच प्लांटच्या समोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा ……. यांनी दिला आहे.