आज गडचिरोली जिल्ह्यात 13 नवीन कोरोना बाधित तर 5 कोरोनामुक्त

107

आज 13 नवीन कोरोना बाधित तर 5 कोरोनामुक्त

गडचिरोली,(जिमाका)दि.04 :आज जिल्हयात 13 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 5 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9624 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9368 वर पोहचली. तसेच सद्या 148 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 108 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.34 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 1.54 टक्के तर मृत्यू दर 1.12 टक्के झाला.

नवीन 13 बाधितांमध्ये गडचिरोलीतील तालुक्यातील 10, अहेरी तालुक्यातील 1, कोरची तालुक्यातील 1, वडसा तालुक्यातील 1, जणाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 5 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 4, अहेरी 1, जणांचा समावेश आहे.
नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील संविधान चौक 1, जिल्हा परिषद कॉलनी 1, त्रिमुती चौक 2, कारगील चौक 1, अरुणोदय अपॉरमेन्ट 1, शिवाजी शाळेजवळ 1, कोटगल 1, बजाज शोमरुम जवळ 1, कोरची तालुक्यातील ग्यारापत्ती 1, वडसा तालुक्यातील गांधी वार्ड 1, अहेरी तालुक्यातील स्थानीक 1, यांचा समावेश आहे. तर इतर जिल्हयातील बाधिता मध्ये 1 जणांचा समावेश आहे.
******