*ढेकणी येथे मतदाता जागृकता रॅली*
*कुनघाडा रै :-* १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना घटनेने मतदानाचा अधिकार बहाल केला आहे. मतदान आपला जन्मसिद्ध हक्क आहे. मात्र दुर्गम व अती संवेदनशील भागातील बरेच नागरिक मतदानापासून वंचित असतात. तसेच बऱ्याच मतदारांची नव्याने नोंदणी करण्यात आली आहे. त्यांच्यात जनजागृती करण्यासाठी माझी शाळा माझा अभिमान उपक्रमांतर्गत पंचायत समिती चामोर्शी व केंद्र तळोधी अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणीच्या वतीने गावातून मतदाता जागृती रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये
शाळेचे मुख्याध्यापक राजेश मुलकलवार मार्गदर्शनात गजानन मट्टामी, अशोक कुमोटी, रविंद्र गावडे, लक्ष्मण कोंदामी, दिवाकर नरोटे, बापू कुमोटी, संतोष कुमोटी, सुधाकर नरोटे, मधुकर कुमोटी, सुभाष दुग्गा, संदीप ताडामी, रामदास ताडामी, मोहन कुमोटी, दिलीप मट्टामी, अर्जुन मडावी, कालिदास ताडामी, बाजीराव ताडामी, रितेश नरोटे, भाष्कर कुमोटी, दासूंदा कुमोटी, निर्मला ताडामी, सुनीता कुमोटी, मादगनबाई सुरजागडे, सुमित्रा कुमोटी, चंद्रकला मट्टामी, अंगणवाडी व शाळेतील विद्यार्थी.
सहभागी झाले होते.