*६७- आरमोरी (अ.ज.) विधानसभा निवडणूकीकरिता सुरक्षा कक्ष सज्ज*
-निवडणूक निर्णय अधिकारी मानसी
गडचिरोली, (जिमाका) दि.29: भारत निवडणूक आयोगाद्वारा जाहीर महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने गडचिरोली सारख्या अतिसंवेदनशील जिल्हयामध्ये दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणा-या मतदान प्रक्रियेतील EVM आणि VVPAT मशीन ठेवण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी मानसी (भा.प्र.से.) यांचे मार्गदर्शनात ६७- आरमोरी (अ.ज.) विधानसभा मतदार संघामधील सुरक्षा कक्ष हे देसाईगंज येथील महाराष्ट्र वखार महामंडळ येथील गोदाम मध्ये तयार करण्यात आले असून सुरक्षा कक्ष 24 तास CCTV कॅमेऱ्यांच्या निगराणी खाली व चोख पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे. तसेच सदर परिसरात मतमोजणीची प्रक्रिया सुद्धा पार पडणार आहे.
सुरक्षा कक्ष हे प्रशांत गड्डम तहसीलदार कोरची, (नोडल अधिकारी) व एम.एन. मांडवगडे, नायब तहसीलदार कोरची (सहा.अधिकारी) यांच्या देखरेखीत संपूर्ण यंत्रणेसह उत्तम सोयी सुविधेने सोपविण्यात आलेले आहे. मतमोजणी साठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी यांचेसाठी मुख्य द्वार असून राजकीय पक्ष, उमेदवार व त्यांचे मतमोजणी प्रतिनिधी तसेच प्रसार माध्यमांसाठी स्वतंत्र द्वाराची व्यवस्था करण्यात आली आहे.
0000