शिंदे व भाजपा लुटारू सरकार, विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांचा आरोप
बंडखोरी करणाऱ्याची पक्षातून हकालपट्टी नक्कीच,अनेक उमेदवार माघार घेणार
वृत्तवाणी न्युज, गडचिरोली (दि,३० ऑक्टोंबर)
गडचिरोली शहरातील चामोर्शी रोड येथील सेलिब्रेशन फंक्शन हॉलमध्ये आज झालेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी महायुतीवर जोरदार प्रहार करत चांगलाच समाचार घेतलेला आहे.
राज्यात महायुती सरकारने बेरोजगारांना, शेतकऱ्यांना चांगलेच वाऱ्यावर सोडलेले आहे अशा या आरक्षण विरोधी सरकारला या निवडणुकीत चांगलाच जनता धडा शिकवणार आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात सुद्धा कमिशन खाणारी सरकार,दोन लाख बेरोजगारांना स्थगिती दिलेल्या महायुती सरकारला शेवटी स्थगिती उठवून २ लाख बेरोजगारांना महाविकास आघाडी ने नोकरी देण्याचे काम यावेळेस करावे लागले आहे. गृहमंत्री फडणवीस असलेल्या जिल्ह्यात सहा महिन्यात ३५३ महिलावर अत्याचार झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत.
येत्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीचे किमान १७५ ते १८० उमेदवार निवडून येऊन सरकार महाविकास आघाडीचीच बनेल तथा विदर्भामध्ये ४५ पेक्षा अधिक उमेदवार निवडून येतील असा विश्वास सुद्धा बोलून दाखविला.
महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, गडचिरोली- लोकसभा क्षेत्राचे खासदार नामदेव किरसान,जिल्हा कांग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे उमेदवार मनोहर पोरेटी, माजी जिल्हा परिषद सदस्य राम मेश्राम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष कविता मोहरकर, शहराध्यक्ष सतीश विधाते, रजनीकांत मोठघरे, हसन गिलानी, प्रभाकर वासेकर, राजेश कात्रठवार, समशेर खार पठाण, मलिक बुधवानी, प्रशांत थोरात, यांचे सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते पत्रकार परिषदेला हजर होते.