कार्यकर्त्यांनी कामाला लागावे : प्रमोद पिपरे
(भाजपा उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या प्रचारार्थ बैठक)
(फोटो – 2 एनव्ही बैठक -बैठकीत मार्गदर्शन करताना गडचिरोली विधानसभा संयोजक प्रमोद पिपरे, बाजूला भाजपाचे ज्येष्ठ नेते रमेश भुरसे, जिल्हा महामंत्री तथा माजी नगरध्यक्ष योगिता पिपरे, गोविंद सारडा, अनिल पोहनकर)
गडचिरोली, 2 नोव्हेंबर
गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या प्रचारार्थ बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन गडचिरोली विधानसभा संयोजक प्रमोद पिपरे यांनी केले.
भाजपा तालुका गडचिरोलीच्या वतीने 31 ऑक्टोबर रोजी शिवणी, बोदली, अमिर्झा, पोर्ला व नवेगाव (मुरखळा) या पाच जिल्हा परिषद क्षेत्राची सर्कल बैठक पार पडली. या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
पुढे बोलताना प्रमोद पिपरे म्हणाले की, खरी लढाई ही बूथवर आहे. त्यामुळे बूथ प्रमुखांनी बूथ मजबूत करण्यासाठी मेहनत घ्यावी. लाभार्थ्यांशी संपर्क करावा व त्यांना भाजपा-महायुतीच्या अधिकृत उमेदवाराला मतदान करण्यासाठी सांगावे, असेही ते म्हणाले.
याप्रसंगी बैठकीला भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, भाजपा प्रदेश सचिव (किसान मोर्चा) तथा ज्येष्ठ नेते रमेश भुरसे, भाजपाच्या जिल्हा महामंत्री तथा माजी नगरध्यक्ष योगिता पिपरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, तालुकाध्यक्ष विलास पा. भांडेकर, गडचिरोली विधानसभा विस्तारक आकाश सातपुते, तालुका महामंत्री बंडू झाडे, रमेश नैताम, मनोज उरकुडे, डॉ. प्रमोद धारणे, पंढरीनाथ दोडके, देविदास नागरे, कवडू डोईजळ, काशिनाथ बबनवाडे, राजेंद्र मुरतेली, संजय खोब्रागडे, आकाश निकोडे, नितीन कुनघाडकर, लोमेश कोलते, वामनराव ठाकरे, प्रभाकर चरकुटे, किर्ती मासुरकर, पांडुरंग भांडेकर, मोरेश्वर भांडेकर, लक्ष्मी कलंत्री, रुमन ठाकरे, गीता सोमनकर व जिल्हा परिषद क्षेत्रातील बूथ प्रमुख व वरिष्ठ पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते