*ऍड. विश्व्जीत कोवासे यांची विधानसभा निवडणूकीतून माघार ; पक्षश्रेष्ठीशी चर्चेनंत्तर उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय

19

*ऍड. विश्व्जीत कोवासे यांची विधानसभा निवडणूकीतून माघार ; पक्षश्रेष्ठीशी चर्चेनंत्तर उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय*

 

 

गडचिरोली :: महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे महासचिव ऍड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी सार्वत्रिक विधानसभा निवडूणूक 2024 करीता गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केले होते, मात्र अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव तथा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे विदर्भ प्रभारी कुणाल चौधरी , राष्ट्रीय आदिवासी सेलचे उपाध्यक्ष तथा लोकसभा निरीक्षक बेलई नाईक यांनी ऍड. विश्व्जीत मारोतराव कोवासे यांच्या निवासस्थानी भेट देऊन समजूत काढली दरम्यान कुणाल चौधरी यांनी भ्रमनध्वनी द्वारे महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारी रमेशजी चेन्निथल्ला, तसेच राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोकजी गहलोत, छत्तीसगड चे माजी मुख्यमंत्री भूपेशजी बघेल, अ. भा. कॉंग्रेस कमिटी सचिव अविनाश पांडे यांच्याशी ऍड. विश्व्जीत कोवासे यांचे बोलणे करून दिले असता पक्षहिताचा व्यापक विचार करून ऍड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.

यावेळी उमेदवारी अर्ज मागे घेतांना त्यांच्या सोबत लोकसभा निरीक्षक बेल्लई नाईक, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत कोराम सह गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील कॉंग्रेसचे जेष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.