मेंडकी येथे पंचायत समिती सदस्य थानेश्वर पाटील कायरकर यांच्या हस्ते मगांराग्रारोहयो कामांचे भूमिपूजन

102

मेंडकी येथे पंचायत समिती सदस्य थानेश्वर पाटील कायरकर यांच्या हस्ते मगांराग्रारोहयो कामांचे भूमिपूजन

मेंडकी ३ मार्च : ब्रम्हपुरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्राम पंचायत मेंडकी येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत विविध कामाचे भूमिपूजन ब्रम्हपुरी पंचायत समिती सदस्य थानेश्वर पाटील कायरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
मेंडकी गावांत नोदंणी झालेले २२०० मजुर आहेत. शेती हंगाम आटोपले असून मजुरांना काम नसल्याने मजुरांना कामासाठी इतर बाहेर ठिकाणी स्थलांतर व्हावे लागत होते. त्यामुळे मजुरांना काम आवश्यक असल्याने ग्रामपंचायत कडे गावातील १०४० मजुरांनी कामाची मागणी केली असता विविध कामे मंजूर करण्यात आली व त्या कामाचे आज भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला. यामुळे आता मजुरांना सोईचे होणार आहे.
भूमिपूजनाच्या वेळी मेंडकी ग्रामपंचायत सरपंचा मंगलाताई ईरपाते, सदस्य राजेंद्र आंबोरकर, सदस्या नयनाताई गुरनुले,कुंदाताई कोरेवार, तांत्रिक अधिकारी रंजीत कसारे, रोजगार सेवक चंदु जेलेवार, अशोक आंबोरकर, राहुल करंजेकर, मारोती फुलबांधे, अनिल करंजेकर, आदि उपस्थित होते.