बलात्काराच्या गुन्हयातील 14 वर्षापासुन फरार
आरोपीला गडचिरोली पोलीसांनी केले जेरबंद
मुलचेरा तालुक्यातील मौजा देशबंधूग्राम येथे राहणारा अनादी अमुल्य सरकार वय 40 वर्ष याला सन 2012 मध्ये सी.सी.क्र. 42/2012 मधील कलम 376,506, भादवी. तसेच सी.सी.क्र. 63/2012 मधील कलम 224 भादवीच्या गुन्हयामध्ये मुलचेरा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करुन अटक करण्यात आली होती. अटकेनंतर त्याला मा. न्यायालयासमोर हजर करण्यात आले. मा. न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीला न्यायालयाबाहेर आणुन बेडया लावत असतांना आरोपी अनादी सरकार हा पोलीसांना चकमा देवून फरार झाला. पोलीसांनी त्याचा पाठलाग केला परंतु तो मिळून आला नाही.
सन 2012 पासुन पोलीसांच्या तावडीतुन फरार झालेला आरोपी अनादी सरकार शोध घेवुनही तो मिळून येत नव्हता, दि. 03/11/2024 रोजी अशी गोपनिय माहिती मिळाली की, सदर आरोपी हा देशबंधुग्राम येथील आपल्या राहते घरी आला आहे, या विश्वसनिय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्री. श्रेणिक लोढा तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी श्री. अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन मुलचेरा येथील प्रभारी अधिकारी पोनि. श्री. महेश विधाते यांचे नेतृत्वात पोउपनि संदिप साखरे, पोलीस हवालदार/1727 चरनदास कुकडकार, पोहवा/5126 विष्णू चव्हान, पोशि/3979 संतोष दहेलकर, पोशि/2327 बाळू केकान, पोशि/4632 सचिन मंथनवार मपोशि/6034 जयश्री आव्हाड, मपोशि/3589 शोभा गोदारी यांनी काल दि. 04/11/2024 रोजी मौजा देशबंधूग्राम येथील अरोपीच्या घरी सापळा रचुन आरोपीला अटक करण्यात आलीे. अटक केल्यानंतर आरोपीला मा. न्यायालय चामोर्शी येथे हजर केले असता, मा. न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्री. श्रेणिक लोढा तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी श्री. अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन मुलचेरा येथील प्रभारी अधिकारी पोनि. श्री. महेश विधाते यांचे नेतृत्वात पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी यशस्वीरीत्या पार पाडले.
।।।।।।