*निवडणूक खर्चाचे तपशिल नोंदविण्यासाठी प्रशिक्षण* 

14

*निवडणूक खर्चाचे तपशिल नोंदविण्यासाठी प्रशिक्षण*

गडचिरोली दि.5 :- निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांना त्यांचे खर्चाचे लेखे किमान तीन वेळा तपासणी करीता निवडणुक निरीक्षक (खर्च) यांचेकडे सादर करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने संबंधीत उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांना खर्च तपशिलाच्या विविध नोंदवहया व प्रमाणके भरण्याबाबत आज प्रशिक्षण देण्यात आले.

निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्री विनीतकुमार, 67- आरमोरी (अ.ज.) विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मानसी, उपविभागीय अधिकारी रणजीत यादव यावेळी उपस्थित होते.

या प्रशिक्षण कार्यक्रमात निवडणूक विषयक सादर करावयाच्या विविध नोंदवहया व प्रमाणके यांचे नमुने कोणते व कशाप्रकारे भरल्या गेले पाहिजे, याबाबत प्रात्याक्षिकाचे माध्यमातून सहायक खर्च निरीक्षक तथा अप्पर कोषागार अधिकारी दीपक उके, पथक प्रमुख (लेखा) तथा सहायक लेखाधिकारी महेश कोत्तावार यांनी समजावून सांगीतले. तसेच उपस्थित उमेदवार व त्यांचे प्राधिकृत प्रतिनीधी यांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे देण्यात आली. 67- आरमोरी (अ.ज.) विधानसभा मतदार संघाअंतर्गत निवडणूक खर्च विषयक तपासणी दिनांक 7, 13 व 19 नोव्हेंबर रोजी नगर परीषद सभागृह देसाईगंज येथे होणार आहे. ठरलेल्या दिनांकास मुळ नोंदवहया व प्रमाणके तपासणीकरीता सादर करणेबाबत निर्देश देण्यात आले. तसेच मुळ नोंदवहया व प्रमाणके सादर न केल्यास निवडणूक आयोगाद्वारे होणारी संभाव्य कार्यवाही, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

000