*निवडणूक निरीक्षक राजेंद्र कटारा यांचेकडून स्ट्राँग रूमची पाहणी* मतदान केंद्रांचा घेतला आढावा

7

*निवडणूक निरीक्षक राजेंद्र कटारा यांचेकडून स्ट्राँग रूमची पाहणी* मतदान केंद्रांचा घेतला आढावा : सोयी सुविधा व स्वच्छतेबाबत दिल्या सूचना गडचिरोली दि.7: ६८-गडचिरोली(अ.ज.) या विधानसभा मतदारसंघाचे सामान्य निवडणूक निरीक्षक श्री.राजेंद्र कुमार कटारा (भा.प्र.से.) यांनी मंगळवारी गडचिरोली येथील क्रांतीवीर बाबुराव शेडमाके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये असलेल्या मतदान यंत्र सुरक्षा कक्षाला भेट देऊन पाहणी केली व सुरक्षेचा आढावा घेतला. चामोर्शी तालुक्यातील नवेगाव रै. येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत , कुरूड येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत, तळोधी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत तसेच चामोर्शी येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेतील मतदान केंद्रांना भेटी देऊन सोयी सुविधा व स्वच्छतेची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या.तसेच श्री.राजेंद्र कुमार कटारा यांनी चामोर्शी-मुल मार्गावरील हरणघाट येथील स्थिर निगराणी पथक, गडचिरोली -चंद्रपूर मार्गावरील पारडी नाका येथील स्थिर निगराणी पथकाला भेट देऊन सदर नाक्यावरील वाहन तपासणी बाबत आढावा घेतला. आचारसंहिता व निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करून योग्य प्रकारे वाहनांची तपासणी करण्याचे निर्देश दिले.