माझ्या गुरूंन द्वारे झालेला माझा हा सत्कार माझ्यासाठी लाख मोलाचा
डॉ रिपल राणेअस्थिरोग तज्ञ डॉ.रिपल राणे सन्मानित
अर्पित वाहाणे
वर्धा
आंतरराष्ट्रीय स्थरावरील प्रसिध्द अस्थिरोग तज्ज्ञ डॉ तन्ना द्वारा डॉ राणे सन्मानीत
माझ्या गुरुंनव्दारे झालेला माझा हा सत्कार माझ्या साठी लाख मोलाचा ….डॉ रिपल राणे
आर्वी नुकताच नागपूर येथील हॉटेल सेंटर पॉईंट येथे विदर्भ ऑर्थोपेडिक सोसायटी द्वारा विदर्भातील सर्व अस्थिरोग तज्ञासाठी भव्य चर्चासत्र voscon२४ चे भव्य आयोजन करण्यात आले होते, या चर्चासत्रामध्ये भारतातील काही प्रसिध्द अस्थीरोग तज्ञ प्रवक्ता म्हणून , तर विदर्भातील जवळ्पास ४००हून अधिक अस्थिव्यंग तज्ञ उपस्थित होते .
या प्रसंगी प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर रिपल राणे यांचा लॉयंस इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४H१ ज्यात भंडारा,गोंदिया , गडचिरोली, यवतमाळ, चंद्रपूर ,अमरावती, वर्धा व नागपूर जिल्ह्याचा समावेश आहे या प्रांताचा प्रांतपाल म्हणून १०० टक्के सकारात्मक मताने निवडून आल्याबद्दल मुंबई येथील अंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रसिध्द अस्थीरोग तज्ञ डॉ डीडी तन्ना साहेब यांच्या हस्ते ,तसेच महाराष्ट्रातील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ सुधीर बाभुळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ रिपल राणे यांचा शाल,श्रीफळ व भेट वस्तु देऊन भव्य सत्कार करण्यात आला.
डॉ तन्ना व डॉ बाभुलकर सर हे माझे अस्थीरोग विषयाचे गुरु आहे व हा माझ्या समाजसेवेच्या कार्याचा सत्कार असून हा सत्कार माझ्यासाठी लाख मोलाचा आहे असे प्रतिपादन विदर्भ अस्थिरोग सोसायटी द्वारा करण्यात आलेल्या सत्काराला उत्तर देताना डॉ रिपल राणे यांनी केले .
या प्रसंगी डॉ रिपल राणे यांनी विदर्भ अस्थिरोग सोसायटी चे अध्यक्ष डॉ सत्यजित जगताप, सचिव डॉ समीर दिडमुठे, डॉ अलंकार रामटेके, डॉ राजीव चौधरी व सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले