*गडचिरोली विधानसभा मतदारसंघात १४७ मतदारांनी केले गृह मतदान*
गडचिरोली दि. ११: महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ६८-गडचिरोली (अ.ज.) मतदारसंघात गृह मतदानासाठी नोंदणी केलेल्या १४७ मतदारांनी दिनांक १० व ११ नोव्हेंबर रोजी मतदानाचा हक्क बजावला.
गृह मतदानासाठी ८५ वर्षावरील ११७ व दिव्यांग ४० अशा एकूण १५७ मतदारांनी नोंदणी केली होती. यातील ८५ वर्षावरील ११७ मतदारांपैकी १०८ मतदारांनी मतदान केले. ४ मतदार मय्यत आहेत. ४ मतदार अनुपस्थित होते व एकाने गृह मतदान करण्यास नकार दिला. ४० दिव्यांग मतदारांपैकी ३९ मतदारांनी मतदान केले. एक मतदार मय्यत आहे.
गृह मतदानाची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
गृह मतदानासाठी २१ पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रत्यक्ष १७ पथके गृह मतदानासाठी मतदारांच्या घरी जाऊन मतदान कक्ष तयार केले व मतदानाची प्रक्रिया पार पाडली. ४ पथके राखीव ठेवण्यात आली होती.गडचिरोली विधानसभा क्षेत्रात गडचिरोली, धानोरा व चामोर्शी या तालुक्यांचा समावेश आहे.