*_भाजपा महायुतीचे सरकार येणारच – काँग्रेसवर हल्लाबोल करत मसली व वाकडी आणि शिवणी येथील कॉर्नर सभेत माजी खासदार अशोकजी नेते यांचे प्रतिपादन_*

18

*_भाजपा महायुतीचे सरकार येणारच – काँग्रेसवर हल्लाबोल करत मसली व वाकडी आणि शिवणी येथील कॉर्नर सभेत माजी खासदार अशोकजी नेते यांचे प्रतिपादन_*

दिं.१३ नोव्हेंबर २०२४

गडचिरोली:- मसली व वाकडी आणि शिवणी येथे भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर सभेत माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांनी मार्गदर्शनात या सभेला उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी विश्वास व्यक्त केला की येत्या 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत भाजपा महायुतीचे सरकार सत्तेत येणारच आहे.या बरोबरच पुढे बोलत काँग्रेसच्या खोट्या प्रचाराचा समाचार घेत सांगितले की, लोकसभेत काँग्रेसने खोटे नॅरेटिव्ह आणि संविधानाचा मुद्दा वापरून जनतेची दिशाभूल केली. काँग्रेसने महिलांच्या खात्यात महिन्याला साडेआठ हजार रुपये देण्याचे खोटे आश्वासन देऊन मतदारांची दिशाभूल केली. परंतु, राज्य सरकारने महिलांच्या सन्मानासाठी मुख्यमंत्री “लाडकी बहीण” योजना सुरू केली, ज्यामुळे 2.40 कोटी महिलांना थेट लाभ मिळाला आहे. या योजनेअंतर्गत पाच महिन्याचे महिलांच्या खात्यात 7,500 रुपये जमा करण्यात आले. मात्र, काँग्रेसने ही योजना बंद व्हावी म्हणून न्यायालयात याचिका दाखल केली, असेही त्यांनी निदर्शनास आणून भाजपा महायुतीचे सरकार येणार असल्याचे सांगितले आणि जनतेला भाजपा महायुतीच्या कार्याबद्दल विश्वास ठेवून ही निवडणूक भवितव्य बदलविणारी निवडणूक आहे.भाजपा महायुतीचे सरकार महिला, युवक, शेतकरी, शेतमजूर,यांच्या हिताचे सरकार आहे.त्यामुळे महायुतीचे सरकार येणारच असा विश्वास व्यक्त करत येत्या 20 नोव्हेंबर ला डॉ. मिलिंदजी नरोटे यांना कमळ या चिन्हावर बहुमताने निवडून देण्याचे आवाहन मा.खा. अशोकजी नेते यांनी केले.

 

कला पथकांच्या चमुने गावातील महिलांना,शेतकऱ्यांना, युवकांना कलेच्या माध्यमातून भाजपा सरकारच्या योजना संबंधी माहिती देत जनजागृती केली.

 

यावेळी कॉर्नर सभेला मध्यप्रदेश चे आदिवासी मंत्री विजय शहा कैर,भाजपाचे नेते तथा माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, भाजपा नेत्या डॉ. चंदाताई कोडवते,किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, तालुकाध्यक्ष विलास पा.भांडेकर,जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे, तालुका महामंत्री बंडूभाऊ झाडे,महिला मोर्चा च्या शहर महामंत्री अर्चनाताई चन्नावार,जिल्हा सचिव लक्ष्मी कलंत्री, विस्तारक आकाशजी सातपुते, माणिक बांगरे महाराज, संजयजी बारापात्रे,कान्होजी लोहंबरे तसेच मोठ्या संख्येने मसली व वाकडी आणि शिवणी या गावातील नागरिक बंधू भगिनीं उपस्थितीत होते.