*निवडणूक निरीक्षक विनीतकुमार यांचेकडून मतदान सुविधा कक्षाची पाहणी*

15

*निवडणूक निरीक्षक विनीतकुमार यांचेकडून मतदान सुविधा कक्षाची पाहणी*

 

गडचिरोली दि.14 : भारत निवडणूक आयोगाद्वारा महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. त्यानुसार 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. या अनुषंगाने 67-आरमोरी (अ.ज.) विधानसभा क्षेत्रातील निवडणूकीची कामे सुरु आहेत. दिनांक 13 नोव्हेंबर व 14 नोव्हेंबर 2024 स्थानिक आदर्श ईग्लिश हॉयस्कुल देसाईगंज येथे मतदान पथकांचे दुसरे प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षण सत्रास निवडणूक निरीक्षक (सामान्य) विनीतकुमार यांनी भेट देऊन मतदान सुविधा कक्षाची पहाणी केली तसेच सुरु असलेल्या प्रशिक्षण वर्गास भेट देऊन मतदान पथकांना मार्गदर्शन केले.

 

आदर्श ईग्लिश हॉयस्कुल देसाईगंज मतदान पथक व निवडणूक कर्तव्यार्थ मतदार यांचेकरीता 2 मतदान सुविधा कक्ष स्थापन करण्यात आले असुन, ज्या मतदारांचे पोस्टल बॅलेट प्राप्त झाले आहेत त्यांचे या ठिकाणी मतदान पथक व निवडणूक कर्तव्यार्थ मतदार यांचे मतदान सुरु आहे. आतापर्यत एकुण 162 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तसेच ही प्रक्रिया 15 नोव्हेंबर व 17 ते 19 नोव्हेंबर या कालावधीतही सुरु राहणार आहे.

 

यावेळी मा.मानसी (भा.प्र.से.) निवडणूक निर्णय अधिकारी 67-आरमोरी विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी, देसाईगंज, मा.रणजीत यादव भा.प्र.से.उपविभागीय अधिकारी कुरखेडा हे प्रामुख्याने उपस्थित होते.