*आरमोरी मतदारसंघात मतदान पथकांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न*

7

*आरमोरी मतदारसंघात मतदान पथकांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न*

गडचिरोली,(जिमाका),दि.14: भारत निवडणूक आयोगाद्वारा महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला असुन दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. या अनुषंगाने 67- आरमोरी (अ.ज.) विधानसभा क्षेत्रातील मतदान पुर्व तयारीची कामे जवळपास पुर्ण झालेले असुन मतदानाकरीता प्रशासन सज्ज झाले आहे.

स्थानिक आदर्श इंग्लिश हायस्कूल, देसाईगंज येथे दिनांक 13 नाव्हेंबर व 14 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान पथकांचे दुसरे प्रशिक्षण पार पडले. या दोन दिवस चाललेल्या प्रशिक्षण सत्रात सर्व क्षेत्रीय अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांचे द्वारा एकूण 346 पथकांना EVM/VVPAT Hands On चे प्रशिक्षण देण्यात आले.

निवडणूक निरीक्षक (सामान्य), विनितकुमार यांनी सुरु असलेल्या प्रशिक्षण वर्गास भेट देऊन मतदान पथकांना मार्गदर्शन केले. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी 67- आरमोरी विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी देसाईगंज श्रीमती मानसी, उपविभागीय अधिकारी कुरखेडा रणजीत यादव, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार देसाईगंज श्रीमती प्रिती डूडूलकर यांचेद्वारा मतदान पथकांना मतदान पथकांतील मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी 1,2 व 3 यांचे मतदानापूर्वी व मतदान संपल्यानंतरचे मतदान-पथकांचे कर्तव्य व जबाबदाऱ्या तसेच अधिकार याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

0000