*महायुतीच्या खोटारड्यांकडून महागाई वाढवून “लाडक्या बहिणींची’ लुट – विजय वडेट्टीवार* 

24

*महायुतीच्या खोटारड्यांकडून महागाई वाढवून “लाडक्या बहिणींची’ लुट – विजय वडेट्टीवार*

 

*गडचिरोली, चामोर्शी प्रचार सभेत विरोधी पक्षनेते वडेट्टीवार गरजले*

 

 

महाराष्ट्राच्या संस्कृतीला बदनाम करतं भाजपने पक्ष फोडीचे निच राजकरण केले. जनावरांच्या खरेदी – विक्री प्रमाणे खोके देऊन आमदार विकत घेत भ्रष्ट महायुती सरकार स्थापन केली.यांच्या काळात देशात व राज्यात प्रचंड महागाई, बेरोजगारी वाढली , अनेक भ्रष्टाचार झाले.कवडीमोल भावाने राज्याची संपत्ती व्यापाऱ्यांना विकून कमिशन खोरीतून नफा कमाविनाऱ्या अशा लुटारुंनी लाडक्या बहिणींना १५०० रुपये देऊन लगेच जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढविले. एका हाताने देऊन दुसऱ्या हाताने दुप्पट वसूल करणाऱ्या या शिंदे, फडणवीस, अजित पवार यांच्या महाभ्रष्ट महायुती सरकारला सत्तेतून पायउतार करा असे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ते गडचिरोली व चामोर्शी येथे आयोजित प्रचार सभेला संबोधित करताना बोलले.

 

आयोजित सभेस अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे केंद्रीय सचिव तिवारी, गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान, महाविकास आघाडी व घटक पक्षाचे अधिकृत उमेदवार मनोहर पोरेटी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, आरपीआय नेते ॲड. राम मेश्राम, बालाजी गाडे, जोशीजी, विश्वजीत कोवासे, रजनीकांत मोटघरे, प्रतीक बारसिंगे, चामोर्शी नगराध्यक्ष जयश्री वायललवार, नितीन वायललवार वैभव भिवापुरे, यासह चामोर्शी व गडचिरोली येथील महाविकास आघाडीचे तसेच सर्व घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

,

पुढे बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, ही केवळ राज्याची निवडणूक नसून दोन विचारांची लढाई आहे. या लढाईत एकीकडे संविधान परिवार तर दुसरीकडे संघ परिवार आहे. या संघ परिवाराने सत्तेच्या बळावर बहुजनांना गुलाम करण्याहेतू संविधान बदलविण्यासाठी षडयंत्र रचले असून देशातील सर्वसामान्य जनतेचा हक्क साबूत ठेवणारा महान ग्रंथ संविधानाला वाचवण्याची जबाबदारी आता तुमची आणि आमची आहे. असेही ते म्हणाले.तर भाजपवाल्यांनी या क्षेत्राचा कुठलाही विकास केला नाही आणि आता उलट्या बोंबा मारत असून खोटे बोलून दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालवीत असल्याची तसेच लाडक्या बहिणींना धमकविण्याचेही काम भाजपकडून सुरू असल्याची टीका देखील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार केली. महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर पोरेटी हे अतिशय प्रामाणिक व काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते असून गावच्या ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदावर त्यांनी योग्यरीत्या आपले कर्तव्य बजावले. अशा कार्यकर्त्याची निष्ठा व मेहनत बघूनच काँग्रेस पक्षांनी यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे या खोके सरकारने देश व राज्य लुटून आपली अस्मिता गुजरातकडे गहाण ठेवली. व व्यापाऱ्यांची तिजोरी भरली. आता सर्वत्र परिवर्तनाची लाट असून राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यास आमच्या पंचसूत्री कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना ३ लाखापर्यंत कर्जमाफी महिलांना मोफत एसटी प्रवास तसेच प्रतिमा ३ हजार ,रुपये युवा बेरोजगारांना प्रतिमा ४ हजार रुपये, 25 लाखापर्यंत मोफत आरोग्य विमा , देण्याचे अभिवचन महाविकास आघाडीने दिले आहे. म्हणून राज्यात महागाई वाढवून लाडक्या बहिणीच लूट करणाऱ्या तसेच संपूर्ण राज्याचे वाटोळे करणाऱ्या भाजप व मित्र पक्षाच्या महायुती सरकारला सत्तेतून बाहेर खेचा असे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान म्हणाले की, लोकसभेत तुम्ही जे एक संघ एकजुटीने कार्य केले यामुळे या खोटारड्या महायुती सरकारचा पराभव शक्य झाला. हे आरक्षण विरोधी व धर्मांधतेचे विष पेरणारे सरकार असून येणाऱ्या २० नोव्हेंबरला सत्तेतून पायउतार करा असे आवाहन त्यांनीं यावेली केले.

तर माझ्या प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ कार्यकालावर तसेच माझ्या शिक्षणाबाबत गैरसमज पसरविण्यासाठी भाजपा कडून फेक नेरटिव्ह पसरवण्याचा अयशस्वी प्रयत्न चालविला जात असून आपण याबाबत सतर्क राहून गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी व येथील जनतेच्या सेवेसाठी मला मतदान करून लोकप्रतिनिधित्वाची संधी द्यावी. असे आवाहन महाविकास आघाडी उमेदवार मनोहर पोरेटी यांनी केले. आयोजित प्रचार सभेत बहुसंख्येने महिला व नागरिक उपस्थित होते.